एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच, मराठवाड्यात 120 जणांचे निलंबन, नादेंडमध्ये सर्वाधिक 58 जणांवर कारवाई

| Updated on: Nov 10, 2021 | 11:00 AM

औरंगाबादः शासनात विलीनकरणाच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) (State transport corporation) कर्मचाऱ्यांचे आंदोलन मंगळवारी आणखी तीव्र झाले. शासन आणि कर्मचारी आपापल्या भूमिकेवर ठाम असून आता महामंडळाने मात्र संपकऱ्याबाबत कठोर पवित्र घेतला आहे. मंगळवारी राज्यभरातील 46 डेपोंमधील 376 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करीत तडकाफडकी निलंबनाची (employee suspension) कारवाई करण्यात आली. कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर ठरवल्यानंतरही कर्मचारी संपावर […]

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच, मराठवाड्यात 120 जणांचे निलंबन, नादेंडमध्ये सर्वाधिक 58 जणांवर कारवाई
औरंगाबादेत एसटीच्या संपामुळे अजिंठा लेणीत पर्यटकांना बैलगाडीत प्रवास करावा लागला, दुसऱ्या छायाचित्रात बीड डेपोतील आंदोलन
Follow us on

औरंगाबादः शासनात विलीनकरणाच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) (State transport corporation) कर्मचाऱ्यांचे आंदोलन मंगळवारी आणखी तीव्र झाले. शासन आणि कर्मचारी आपापल्या भूमिकेवर ठाम असून आता महामंडळाने मात्र संपकऱ्याबाबत कठोर पवित्र घेतला आहे. मंगळवारी राज्यभरातील 46 डेपोंमधील 376 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करीत तडकाफडकी निलंबनाची (employee suspension) कारवाई करण्यात आली. कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर ठरवल्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळ कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका (Contempt petition ) दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

मराठवाड्यात 120 कर्मचाऱ्यांचे निलंबन

राज्यभरातील 376 एसटी कर्मचाऱ्यांवर काल निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक कर्मचारी नांदेड जिल्ह्यातील असून ती संख्या 58 एवढी आहे. तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत लातूर 31, जालना 16, परभणी 10 आणि औरंगाबादेत 05 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. औरंगबाादच्या सिडको आगारातील 05 जणांवर ही कारवाई करण्यात आली.

आजही आंदोलन तीव्र, कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. काल औरंगाबादसह अनेक कर्मचाऱ्यांनी सकाळी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. तसेच दुपारनंतर कर्मचाऱ्यांनी मुंडनही करून घेतले. आज बुधवारी सकाळपासून औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मनाबाद, जालना, हिंगोलीतील आंदोलकांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी घोषणाबाजी सुरु केली आहे.

इतर बातम्या-

ग्रामसेवकांबद्दलचे वक्तव्य भोवले, राज्यभरात ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन, आ. शिरसाट यांनी विनाशर्त माफी मागण्याची अट

धक्कादायकः औरंगाबादेत दुसरीतल्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या? मद्यधुंद बापानेच घात केल्याचा संशय