औरंगाबादः नवतरुणांना आणि उद्योजक होण्याची स्वप्न पाहणाऱ्या होतकरूंना स्टार्टअपकरिता सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळण्याची संधी औरंगाबादेत उपलब्ध झाली आहे. ‘मॅजिक’ आणि टाटा टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या सीएसआर प्रकल्पाच्या सहाकार्याने नवोदित उद्योजकांसाठी तसेच स्टार्टअप्स इको सिस्टिम यांच्यासाठी टाटा टेक्नोलॉजीज मॅजिक इनोव्हेशन हब (TMIH) या ऑनलाइन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठवाडा अॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेटर कौंसिल व टाटा टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या सीएसआर प्रकल्पाच्या सहकार्याने नवोदित उद्योजक तसेच स्टार्टअप्स इको सिस्टिम यांच्यासाठी ‘टाटा टेक्नोलॉजीज मॅजिक इनोव्हेशन हब (TMIH)’ या ऑनलाइन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत 28 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन पुढील तीन महिने चालणार असून नवउद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ याद्वारे मिळणार आहे.
आजपासून सुरु होणाऱ्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला टाटा टेक्नोलॉजीज लिमिटेड, सीआयआय, अॅक्सलरेटिंग ग्रोथ ऑफ न्यू इंडिया इनोव्हेशन, युरोपियन बिझनेस टेक्नोलॉजी सेंटर, महाराष्ट्र सोसायटी, एचडीएफसी बँक स्टार्टअप आणि मॅजिक यांच्या प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती असेल. आगामी तीन महिन्यात मॅजिक टीएमआयएचच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहिती सांगणारी सत्रे, नॉलेज सेमिनार्स स्टार्टअप्सबद्दल संपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी वेबिनार, वर्कशॉप तसेच विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. मॅजिकचे संचालक आशिष गर्दे म्हणाले, नवउद्योजकांना त्यांचे नावीन्य दाखवण्याची ही उत्तम संधी आहे. सीएसआर प्रकल्पाअंतर्गत टाटा टेक्नोलॉजीजच्या रेडी इंजिनिअर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना यात स्थान देण्यात आले आहे.
इतर बातम्या-