औरंगाबादः दिवाळीच्या काळात औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील (Aurangabad crime) ग्रामीण भागातदेखील अनेक ठिकाणी घरफोडी आणि चोरीच्या घटना घडल्या. गंगापूर तालुक्यातील (Gangapur Talika) डोणगाव येथेही चोरट्यांनी एक घर फोडून 50 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. मात्र या घरात चोरी करणारे चोर रस्त्यावरील सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यात ते गावातील रस्त्यांवरून बिनधास्त फिरताना दिसत आहेत. चोरी करण्यासाठी आलेले हे एवढे बिनधास्त कसे फिरू शकतात, याबद्दल गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिका माहितीनुसार, डोणगाव येथील अजय सागरे यांचे घर चोरट्यांनी फोडले. चोरांनी घर फोडून घरातील 50 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. त्यानंतर गावात फिरत असताना गावातील दोन नागरिकांनी चोरट्यांना आवज दिला. तेव्हा त्यांनी नागरिकांना दगड फेकून मारले आणि त्या ठिकाणाहून पसार झाले. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर उपनिरीक्षक अमोल ठाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
अन्य एका घटनेत विहामांडवा येथून जवळ असलेल्या शिवारात विजेच्या लोंबकळलेल्या तारेचे एकमेकांवर घर्षण होऊन आग लागली. या आगीत अठरा ते वीस एकर ऊस जळून खकाक झाला. यात संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महावितरण कंपनीने व महसूल विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त उस उत्पादक शेतकरी दत्तू खराद, अरुण खराद, विनायक खराद, अनुसया गायकवाड आदींनी केली आहे.
इतर बातम्या-