औरंगाबादः जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील (Gangapur Farmers) शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून स्वतंत्र विद्युत रोहित्र अर्थात लाइटच्या डीपीची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनही केले. मात्र शेतकऱ्यांची मागणी (Gangapur Farmers agitation) मान्य न झाल्यानुळे त्यांनी आज आक्रमक होत आंदोलन केले. वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठ्या अभावी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. आज महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याशी (MSEDCL) त्यांची बाचाबाचीदेखील झाली.
विद्युत रोहित्राच्या मागणीवरून गंगापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला कार्यालयातच कोंडले. मागील सहा महिन्यांपासून हे विद्युत रोहित्र बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंत्यासमोर आक्रमकरित्या आपलं गाऱ्हाणं मांडलं. यावेळी सहाय्यक अभियंत्याशी शेतकऱ्यांचे वाद झाले. यात शेतकरी आणि अभियंत्यादरम्यान बाचाबाची झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले.
गंगापूर येथील हे विद्युत रोहित्र मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्या अभावी शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत रोहित्र दुरूस्त करून द्यावे, अशी मागणी येतील शेतकऱ्यांची आहे.
इतर बातम्या