मराठवाड्यात शुक्रवारी 2 हजार 109 रुग्णांची नोंद, कोरोना संसर्गात कोणते जिल्हे अग्रस्थानी?

| Updated on: Jan 15, 2022 | 9:41 AM

मराठवाड्यात काल शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 2 हजार109 रुग्णांची नोंद झाली. या विभागात औरंगाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. नांदेड जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट सर्वाधिक गणला गेला आहे.

मराठवाड्यात शुक्रवारी 2 हजार 109 रुग्णांची नोंद, कोरोना संसर्गात कोणते जिल्हे अग्रस्थानी?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः राज्यभरातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीप्रमाणेच मराठवाड्यातील आकडेही वाढताना दिसत आहे. मराठवाड्यात काल शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 2 हजार109 रुग्णांची नोंद झाली. या विभागात औरंगाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. नांदेड जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट सर्वाधिक गणला गेला आहे. या जिल्ह्यात दर 100 रुग्णांमागे 24 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. तर त्यापाठोपाठ औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट 16 टक्के आणि लातूरचा 15 टक्के एवढा वाढला आहे.

शुक्रवारी मराठवाड्यातील स्थिती काय?

मराठवाड्यात काल 17,018 रुग्णांपैकी 2 हजार109 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
शुक्रवारी एकाच दिवसात मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढीलप्रमाणे रुग्ण आढळले.

औरंगाबाद- 520
नांदेड- 553
लातूर – 502
जालना- 163
उस्मानाबाद- 153
हिंगोली- 38
बीड- 64

नांदेड मनपाची हेल्पलाइन, नियंत्रण कक्षाची स्थापना

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, मनपाने वॉर रुम सज्ज ठवली आहे. महानगरपालिकेतील क्रमांक 305 येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाला नागरिकांच्या सुविधेसाठी हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून नंबर- 02462-262626 उपलब्ध करून देण्यात आला आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून शिल्लक खाटांची संख्या, हॉस्पिटल संपर्क क्रमांक व टेस्टिंग सेंटरची माहिती आदी दिली जाईल. कोरोना आजाराबाबत समुपदेशन, कोणत्याही प्रकारची माहिती, दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

इतर बातम्या-

Scholarship exam : पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर; अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण, हायव्होल्टेज तारांचा झटका, 30 वर्षीय अमोल पाटीलसह तिघे गतप्राण