औरंगाबादः कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर औरंगाबादमधील पर्यटकांची (Aurangabad tourism) संख्या वाढू लागली आहे. गेल्या पाच महिन्यांत देशातील तसेच विदेशातील अनेक पर्यटकांनी ऐतिहासिक औरंगाबाद (Historical Aurangabad) नगरीला भेट दिल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील अजिंठा लेणी, औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा(Bibi Ka Makbara) , वेरूळ लेणीला 4 लाख 24 हजार 604 भारतीय तर 484 विदेशी पर्यटकांनी मागील पाच महिन्यात भेट दिली आहे. यापैकी ग्राहकांचा सर्वाधिक ओढा बीबी का मकबऱ्याकडे दिसून आला. दिवाळीच्या आठ दिवसांच्या सुटीत तब्बल 82 हजार 856 तर 190 विदेशी पर्यटकांनी (Foreign Tourist) येथे भेट दिली. त्यामुळे कोरोना काळानंतर खूपच दिलासादायक चित्र दिसत आहे.
कोरोना संक्रमणामुळे बंद असलेली पर्यटनस्थळे जूनमध्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. सुरुवातीला येथील स्थळांवर पर्यटकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता थंडीचा मौसम सुरु झाल्यापासून पर्यटकांची संख्याही हळू हळू वाढत आहे. जिल्ह्याती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच ऐतिहासिक स्मारकात तिकीट आकारले जाते. त्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात तब्बल 1.20 लाख पर्यटक आले. मकबऱ्यापाठोपाठ दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणीला भेट देमाऱ्यांची संख्या अधिक असून पर्यटकांचा उंचावलेला आलेख या व्यवसायांवर अवलंबून असलेल्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.
जून महिन्यापासून औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या हळू हळू वाढत आहे. मात्र ऑगस्ट महिन्यापर्यंत देशातील 64,606 पर्यटकांनी तर विदेशातील 44 नागरिकांनी पर्यटनस्थळांना भेट दिली. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील पर्यटकांनी एक लाखांचा आकडा पार केला तर विदेशातील 190 पर्यटकांनी ऐतिहासिक स्थळांना भेट दिली.
इतर बातम्या-