औरंगाबादः शहरातील पंचतारांकित हॉटेल अॅम्बेसेडरमधील (Hotel Ambesedar) विवाह सोहळ्यातून दोन चोरट्यांनी तब्बल 12 तोळे सोन्याचे दागिने (Robbery) आणि दोन लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. तसेच चोरट्यांनी एक मोबाइलदेखील पळवला आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली. सिडको, गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश नारंग हे व्यापारी असून त्यांच्या मुलाचे खामगाव येथील घोपे कुटुंबियांच्या मुलीशी हॉटेल अँबेसेडरमध्ये मंगळवारी लग्न होते. सकाळपासूनच हॉटेलमध्ये लग्नाची घाई सुरु होती. राजेश यांनी वधूसाठी आणलेले दागिने एका बॅगमध्ये ठेवले होते. परंतु काही वेळाकरिता बॅगकडे दुर्लक्ष झाल्यानंतर चोरट्यांनी या बॅगवर डल्ला मारला.
हॉटेलमधून 12 तोळे सोने आणि इतर मुद्देमाल चोरणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो लग्न समारंभातून दागिने लंपास करणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचेही उघड झाले. त्यानुसार, पोलिसांनी तपास कार्याला वेग दिला. तसेच चोरटा अँबेसेडरमधून बाहेर पडल्यानंतर हर्सूलच्या दिशेने गेल्याचेही सीसीटीव्हीतून समोर आले. गुन्हे शाखा व सिडको पोलिसांची पथके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
इतर बातम्या-