औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक(Investment in Gold) करायची की नाही, असा प्रश्न ग्राहकांना सतावत आहेत. परिणामी सराफा बाजारातही फार हालचाल दिसून येत नाही. औरंगाबादच्या सराफा बाजारात (Aurangabad Sarafa Bajar) गुरुवारी सोन्याच्या दरात आणखी 400 रुपयांची घसरण पहायला मिळाली. गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 46,800 रुपये प्रति तोळ्याच्या आसपास नोंदले गेले. काल हे दर 47,200 रुपये प्रति तोळा एवढे होते. त्यामुळे या आठवड्यात सोन्याच्या दरातील घसरणीची मालिका सुरूच आहे, असे म्हणता येईल. म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार असेल, तर हीच संधी आहे. कारण दिवाळीदरम्यान सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही फार हालचाल नाही. औरंगाबादमध्ये आज चांदीचे दर 67,000 रुपये प्रति किलो असे आहेत. कालही चांदीचे हेच दर होते. देशातील विविध शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आढळत असते. तसेच शेअर-मार्केटमधील तेजी-मंदीचा प्रभावही सोने-चांदीच्या दरांवर होत असतो. गोल्ड रिटर्न्स या हिंदी वेबसाईटनुसार, आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर 46,380 रुपये प्रति तोळा, पुण्यातले दर 45,590 रुपये प्रति तोळा, नागपूरमध्ये 46,380 रुपये प्रति तोळा, नवी दिल्लीतील दर 46450 रुपये प्रति तोळा तर हैदराबादमधील दर 44,200 रुपये प्रति तोळा एवढे आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर सोन्याच्या दरात तेजी आहे. सोन्यात ऑक्टोबरच्या फ्यूचर ट्रेडमध्ये 4 रुपयांची तेजी असून तो 47,072.00 रुपयांच्या स्तरावर आहे. तर सप्टेंबरमधील चांदीच्या फ्यूचर ट्रेडमध्ये 21.00 रुपयांची घसरण पहायला मिळाली. हा दर 63,552.00 असा नोंदवला गेला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात तेजी दिसतेय. गोल्ड रिटर्न्स या हिंदी वेबसाइटवरील माहितीनुसार, अमेरिकेत सोन्याचे दर 1.05 डॉलरने वाढले. सोन्यात 1,814.32 डॉलर प्रति औसांवर ट्रेडिंग सुरू आहे. तर चांदीच्या व्यापारातही 0.01डॉलरच्या तेजीसह 24.17 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यापार सुरू आहे.
क्रिप्टो करन्सीची आजकाल खूप चर्चा आहे. हा श्रीमंत बनण्यासाठीचा सोपा मार्ग समजला जात आहे. बिटकॉइन क्रिप्टो करन्सीचा सध्याचा कॉइन डेस्कवरील दर 49,614 डॉलर एवढा सुरू आहे. सध्या त्यात 5.53 टक्क्यांची वृद्धी दिसून येत आहे. या दरावर बिटकॉइन क्रिप्टो करन्सीचे मार्केट कॅप 932.94 अब्ज डॉलर एवढे आहे. एका वर्षात बिटकॉइन 71% रिटर्न देते, अशी नोंद आहे.
इतर बातम्या:
Gold Price Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले, पटापट तपासा
अबब! 2000 रुपयांचा वडापाव; सोन्याचा वर्ख, चीज स्टफिंग, सारा थाटच न्यारा