Aurangabad Gold: सोने-चांदी पुन्हा घसरले, सणासुदीत खरेदीची संधी, जाणून घ्या औरंगाबाद शहरातील भाव

| Updated on: Sep 08, 2021 | 8:55 PM

सोमवारी सोने आणि चांदी या दोहोंच्या दरात चांगलीच वाढ झालेली दिसून आली होती. चांदीने तर मोठी वृद्धी दर्शवली होती. मात्र मंगळवारी दोन्हींच्या दरात काहीशी घसरण दिसली. तसेच बुधवारी तर चांदीने चांगलीच लोळण घेतली. त्यामुळे सोने-चांदीच्या दरांच्या ट्रेंडचा नेमका माग कसा काढायचा हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे.

Aurangabad Gold: सोने-चांदी पुन्हा घसरले, सणासुदीत खरेदीची संधी, जाणून घ्या औरंगाबाद शहरातील भाव
संग्रहित छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: आठवड्याच्या सुरुवातीला तेजीत असलेले सोन्या-चांदीचे भाव पुन्हा एकदा घसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणपती-गौरींच्या दिवसात सोने महागते की काय, या चिंतेत असलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीने चांगलीच घसरण अनुभवली आहे. औरंगाबादमध्ये (Gold rate in Aurangabad, Maharashtra) सोन्याने तर 47 हजार रुपयांचीही पातळी ओलांडून घसरण घेतली आहे. तर सोमवारी चांगलीच तेजी दर्शवलेल्या चांदीनेही मोठी घट घेतली.

शहरातील सोन्या-चांदीचे भाव

बुधवारी दिनांक 08 सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 46,900 रुपये प्रति तोळा एवढे होते. सोमवारी हे दर 47,500 रुपये प्रति तोळा होते. मात्र दोनच दिवसात सोन्याने 600 रुपयांपेक्षा जास्त घसरण घेतली. सोन्याचे हे दर 22 कॅरेट प्रकारातील असून आता येत्या काळात दरांचा आलेख चढा असेल की उतरणीच्या दिशेनेच असेल, याबाबत ग्राहकांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान चांदीच्या भावातही प्रचंड घट झालेली दिसून येत आहे. औरंगाबादमध्ये चांदीचे दर 66500 रुपये प्रति किलोवर आहेत. सोमवारी चांदीच्या दरांनी प्रचंड उसळी घेतली होती. आठवड्याच्या सुरुवातीला हे दर -3000 ते 3500 हजार रुपयांनी वाढलेले होते. मात्र शेअर-बाजारातील हालचालींमुळे चांदीचे दर घसरल्याचे चित्र दिसून येत आहे.

आठवड्याच्या तीन दिवसांत प्रचंड चढ-उतार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कमोडिटी मार्केटमध्येही प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. त्यामुळे मार्केटमधील सोन्या-चांदीच्या दरातही कमालीचा चढ-उतार दिसून येत आहे. अगदी आठवड्यातील तीन दिवसातही ही अस्थिरता अनुभवता येईल. सोमवारी सोने आणि चांदी या दोहोंच्या दरात चांगलीच वाढ झालेली दिसून आली होती. चांदीने तर मोठी वृद्धी दर्शवली होती. मात्र मंगळवारी दोन्हींच्या दरात काहीशी घसरण दिसली. तसेच बुधवारी तर चांदीने चांगलीच लोळण घेतली. त्यामुळे सोने-चांदीच्या दरांच्या ट्रेंडचा नेमका माग कसा काढायचा हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे.

हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?

सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते. भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो. (Today’s gold and silver rate in Aurangabad sarafa market, Maharashtra)

इतर बातम्या- 

Gold-Silver Rate : सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या किती महाग झालं 10 ग्रॅम सोनं?

पुण्यात माजी आमदाराच्या पुतण्याच्या घरी चोरी, 100 तोळे सोन्यासह लाखोंची लूट