औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे औरंगाबाद जिल्हा आता पूर्णपणे अनलॉक होणार आहे. सोमवारपासून (21 जून) जिल्ह्यातील लॉकडाऊनसंबंधित नियम शिथिल केले जाणार आहेत. सोमवारपासून जिल्ह्यात जिम, सलून, मॉल्स, नाट्यगृह, चित्रपटगृह, विवाह,कार्यक्रमांना 50% क्षमतेच्या उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. तसेच आता शासकीय कार्यालयात 100 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.
राज्यातील, देशातील कोरोना अजून संपलेला नाही, केवळ कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे काही कडक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रसासनाने घेतला आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा पसरू नये, कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले पाहिजेत. मास्क लावा, सतत हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा, या त्रिसुत्रीचं पालन करायला हवं, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. दुसरी लाट सरल्यामुळे लोक आता घराबाहेर पडू लागले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण युद्धपातळीवर राबविने गरजेचे आहे. तसे प्रयत्न विविध जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र, असे असले तरी औरंगाबादकर लसीकरणाविषयी सतर्क आणि जागरुक असल्याचे दिसत नाही. येथे लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढत नाहीये. याच कारणामुळे औरंगाबाद पालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मनपा प्रशासक पांडे हे औरंगाबाद शहरात लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार करत आहेत.
सध्या औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 35 हजार लसी उपलब्ध आहेत. नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी औरंगाबाद मनपाकडून येत्या 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सध्या यावर काम सुरु आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे या वेळेत तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची तयारी प्रशासनाकडून केली जातेय. याच काळात तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी व्हावी म्हणून लसीकणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवणे गरजेचे आहे. मात्र, औरंगाबादेत लसीकरणाची टक्केवारी वाढत नसल्यामुळे ही चिंतेची बाब असून त्यासाठी उपायोजना करण्याचे आव्हान येथील प्रशासनापुढे आहे.
नुकतंच औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार, प्रत्येक शाळेत शाळा नियोजन समितीची बैठक घ्या, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच शाळा निर्जंतुकीकरण कारण्यासोबत हात धुणे, सॅनिटायझर वापरण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाने आदेश दिल्या जात आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन
औरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती