Vaccination: लस न घेता फिरणाऱ्या 37 जणांना दंड, औरंगाबादेत मनपाची पथके सक्रिय, लसीचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर गुन्हे!

| Updated on: Dec 16, 2021 | 11:22 AM

पात्र असूनही कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्या नागरिकांवर महापालिका दंडात्मक कारवाई करत आहे. या कारवाईसाठी महापालिकेने पंधरा पथके शहरात नेमली आहेत. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशावरून ही पथके डोस चुकवणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई करत आहेत.

Vaccination: लस न घेता फिरणाऱ्या 37 जणांना दंड, औरंगाबादेत मनपाची पथके सक्रिय, लसीचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर गुन्हे!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेने लसीकरण (Aurangabad Vaccination) सक्तीची मोहीम आणखी कठोर केली आहे. त्याचाच भाग म्हणून 15 डिसेंबरपासून पात्र असूनही लसीचा डोस न घेणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत पहिल्याच दिवशी 37 नागरिकांवर पालिकेच्या पथकाने कारवाई केली. या सर्वांकडून 500 रुपये याप्रमाणे 18,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आता पुढील काही दिवस ही कारवाई आणखी तीव्र केली जाईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शहरात लसीकरणाची काय स्थिती?

औरंगाबाद शहरात आतापर्यंत 10 लाख 55 हजार 654 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे अपेक्षित होते. मात्र यापैकी 8 लाख 48 हजार 190 नागरिकांनी पहिला डोस घेतलाय तर 4 लाख 75 हजार 776 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच तब्बल 71 हजार 582 नागरिकांनी दुसरा डोस चुकवलेला आहे.

शहरावर पंधरा पथकांचे लक्ष

पात्र असूनही कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्या नागरिकांवर महापालिका दंडात्मक कारवाई करत आहे. या कारवाईसाठी महापालिकेने पंधरा पथके शहरात नेमली आहेत. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशावरून ही पथके डोस चुकवणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई करत आहेत. या दंडातून जमा झालेल्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम पोलीस प्रशासन आणि पन्नास टक्के महापालिका फंडात जमा केली जाणार आहे.

बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर गुन्हे- जिल्हाधिकारी

शहरात बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकारावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. स्वतःसह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच ज्यांनी ज्यांनी बोगस प्रमाणपत्रे घेतली आहेत, त्यांनी स्वतःहून ती प्रशासनाकडे आणून द्यावीत, त्यानंतरही त्यांनी लस घेतली नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असा इशारा त्यांनी दिला.

इतर बातम्या-

India tour of South Africa: स्फोटक प्रेस कॉन्फरन्सनंतर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना

‘नैसर्गिक शेती’ची सुरवात अन् प्रवास, आता देशात घेतली जातेय दखल..!