औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून (Corona third wave) बचाव करायचा असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच 3 जानेवारीपासून जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination for children) राज्यभरात केले जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अशा 4 लाख मुला-मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. तसेच यापूर्वी दोन डोस झालेल्या, कोमॉर्बिडिज असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही बूस्टर डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिली. या मोहिमेचे योग्य पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्या.
– जिल्ह्यातील लहान मुलांना ‘कोव्हॅक्सिन’ या भारतीय बनावटीची लस देण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. कारण या वयोगटातील मुलांना कोव्हशील्ड लस देण्यास अद्याप भारत सरकारने मंजुरी दिलेली नाही.
– ज्येष्ठ नागरिक व फ्रंटलाइन वर्कर्सनी यापूर्वी ज्या कंपनीची लस घेतली आहे (कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन), त्याच लसीचा डोस बूस्टर डोस म्हणून देण्यात येणार आहे.
– पहिले दोन डोस एका कंपनीची लस आणि तिसरा डोस दुसऱ्या कंपनीचा घेता येऊ शकतो का, याबाबत अद्याप संशोधन सुरु आहे. लवकरच यासंबंधीचा निर्णय घेण्यात येईल.
शहरात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले असूनही नागरिकांमध्ये पुरेशी जागरूकता आलेली नाही. जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक नागरिकांनी अजूनही लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. ओमिक्रॉनचा धोका बळावत असतानाच लसीकरण केंद्रावरील संख्या रोडावल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील 15 दिवसात फक्त 44,907 जणांनी पहिला डोस घेतला आहे. त्याआधीच्या पंधरा दिवसात ही संख्या 1 लाख 65 हजार 789 एवढी होती.
इतर बातम्या-