औरंगाबादः वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे शहरात तुम्ही दुचाकी किंवा चारचाकीतून विनामास्क फिरला असाल तर कदाचित तुमचे वाहन ब्लॅकलिस्ट झालेले असू शकते. कारण आरटीओ कार्यालयाने विनामास्क फिरणाऱ्या 1875 चालकांचे वाहन ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.
कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. मात्र आपली जबाबदारी न समजता सर्रास विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. शहरात अशा प्रकारे विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. विनामास्क वाहनधारकांविरुद्ध महापालिकेच्या पथकाकडून फोटो काढण्यात येत आहेत. ते फोटो आरटीओ कार्यालयाच्या मेल आयडीवर पाठवले जात आहेत. त्यानंतर वाहन चालकांना ई-चालान पाठवण्यात येते.
– या वाहनधारकांना टॅक्स, पीयूसी, इन्शुरन्स फिटनेस करता येणार नाही.
– एवढेच नव्हे तर वाहन मालकाला वाहन विक्री करता येणार नाही.
– ई चालान पाठवण्यात आलेल्या वाहनधारकांनी आलेल्या दंडाची रक्कम त्वरित भरली तर त्यांचे वाहन ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचू शकते. आतापर्यंत 1875 वाहने ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहेत.
इतर बातम्या-