औरंगाबादः औरंगाबादसह मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा (Cold wave decreased) जोर कमी झाला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अनेक भागातील तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा खाली घसरला होता. मात्र सध्या किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागतेय की काय असे चित्र आहे. मात्र पुढचे दोन दिवस मराठवाड्यातील (Weather in next 2 days) काही भागातील तापमान एक ते दोन अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी (Meterologist ) वर्तवली आहे. त्यानंतर किमान तापमानात हळू हळू वाढ होईल, मात्र 19 फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यताच वर्तवली जात आहे.
औरंगाबाद- किमान 13.6, कमाल- 31.4
परभणी- किमान 14.0, कमाल- 32.6
नांदेड- किमान 19.0, कमाल- 32.6
बीड- किमान- 13.0, कमाल 29.0
उस्मानाबाद- किमान- 14.0, कमाल- 32.3
हिंगोली- किमान – 18.0, कमाल- 31.0
सध्या किमान आणि कमाल तापमानात काहीशी वाढ झालेली असली तरीही पुढील दोन दिवस उत्तर मराठवाड्यात म्हणजे परभणी, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यात आहे. त्यानंतर किमान तापमानात हळू हळू 2 ते 4 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच विस्तारीत अंदाजानुसार (ERFS) मराठवाड्यात 13 ते 19 फेब्रुवारीदरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता, मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रत्र कृष्णानंद होसळीकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, रा्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे 10 अंश एवढे नोंद झाले असून मुंबईदेखील 17 अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. राज्यातील किमान तापमानात पुन्हा एकदा किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान थोडे खाली आहे. तर उत्तरेकडे थंडीचा प्रभाव अधिक आहे. विदर्भातही थंडीचा प्रभाव अधिक आहे.
भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ के. होसळीकर यांचे ट्विट-
राज्यात आजचे किमान तापमान 9/02:
Satara 11.8, Slp 17, Jalgaon 16
Pune 12, Nashik 13, Baramati 11.4
Sangli 16.1, Malegaon 12.4, Klp 16.5
MWR 11.9, Matheran 13.6
Nanded 18.8, Parbhani 18.5, Jalna 17
Scz 18, Rtn 17.9, Dahanu 16.8, Thane 18.2, Harnai 19.3
Nagpur 17 pic.twitter.com/0Cj6af59Zp— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 9, 2022
दरम्यान, मराठवाड्यातल्या काही ठिकाणीच तापमानाचा पारा का घसरणार, असाही प्रश्न उपस्थित होतोय. तर उत्तरेकडील वाऱ्याचा जोर कमी होत आहे. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उत्तरेकडील वाऱ्यांचा परिणाम जाणवत असल्याने तेथे थंडी आहे. परंतु, पुढे दोन दिवसांत सर्वत्र किमान तापमानात संथ गतीने वाढ होणार आहे.
हिवाळा संपत आल्यामुळे हळू हळू तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे पिकांवर याचा फार परिणाम होणार नाही. मात्र काही ठिकाणी ज्वारीवर चिकटा किंवा खोड अळीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तसेच पिकांवर कीड आणि इतर रोड पडणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.
इतर बातम्या-