औरंगाबादः शहर आणि जिल्ह्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून अचानक बदल (Climate change) जाणवत आहेत. कधी तापमान अचानक वाढतेय तर कधी अचानक तापमानाचा पारा घसरलेला दिसून येतोय. आकाशाच ढगांचे अच्छादन दिसून येतेय तर कधी हलका पाऊसही पडतोय. तर कुठे गारपीटही झालेली दिसून येत आहे. कधी हिवाळ्यासारखी थंडी पडतेय तर कधी थंड वाऱ्यांचाही सामना (Weather report) करावा लागतोय. या बदलत्या वातावरणामुळे शहरातील हवा आरोग्यावर परिणाम करणारी ठरतेय.
औरंगाबाद शहराचे तापमान सोमवारी एकाच दिवसात 5 अंशांनी घसरले. सोमवारी हे तापमान 11 अंशांवर पोहोचले. थंडीचा कडाकाही वाढला. मात्र मध्येच बाष्प, उष्ण हवा, आर्द्रता आणि कमी दाबामुळे वातावरणाच कमालीचे बदल जाणवत आहे. उत्तरेतील शीत वारे महाराष्ट्रात दाखल होत असल्याचे हे बदल जाणवत आहे. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊसही झाला.
थंड वारे, बाष्प, उष्ण हवा, आर्द्रता आणि कमी दाबामुळे विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. येत्या 14 जानेवारीपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची तसेच फळबागांची आणि नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांनी विजांच्या कडकडाटाची पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन दामिनी हे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
दामिनी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini
राज्यात सोमवारी नाशिकचे किमान तापमान सर्वात कमी 7.3 अंश तर जळगावचे तापमान 9 अंशांवर घसरले. राज्यातील इतर शहरांच्या तापमानात 1 ते 3 अंशांपर्यंत कुठे वाढ तर कुठे घसरण दिसून आली. यवतमाळचे कमाल तापमान 7 अंशांनी घसरले. त्यानंतर चंद्रपूर 6 अंश म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबई, कुलाबा, गोंदिया, नागपूर, वर्ध्याच्या तापमानात 5 अंशांची घसरण दिसून आली.
इतर बातम्या-