Dhananjaya Yeshwant Chandrachud: अयोध्या खटल्याचा निकाल देशाच्या इतिहासातील टर्निंग प्वाइंट होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निकाल दिला होता. निकाल देणाऱ्या घटनापीठात न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा समावेश होता. या खंडपीठातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. ते पुणे जिल्ह्यातील कनेरसर या आपल्या गावी आले होते. यावेळी त्यांनी अयोध्या खटल्याचा निकाल देताना काय केले? त्यासंदर्भातील किस्सा सांगितला.
सरन्यायाधीस चंद्रचूड म्हणाले की, मी परंपरेमुळे नियमित पूजा करतो. अनेक वेळा कोर्टात काम करताना पर्याय सूचत नाही. जेव्हा अयोध्येच काम माझ्या पुढे आले, त्यावेळी आम्ही तीन महिने अयोध्या प्रकरणावर विचार करत होतो. शेकडो वर्ष अयोध्या प्रकरणावर मार्ग सापडले नव्हता. ते काम आमच्यासमोर आले होते. त्यावेळी मी माझी रोजची पूजा करताना भगवंतासमोर बसलो. त्यांना सांगितले मार्ग तुम्हीच शोधून द्या. आपली अस्था असेल, आपला विश्वास असेल तर भगवंतच मार्ग शोधून देतात, अशी भावना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली. ते आपल्या कनेरसर गावी आले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.
स्त्री सशक्तीकरणाच्या निर्णयामुळे देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. पाकिस्तान, चीन सीमेवर स्त्रिया कार्यरत आहे. देश बदलत चालला आहे. आम्ही आमच्या कोर्टात महिला सशक्तीकरणास वाव दिला. मला स्त्री सशक्तीकरणाचा प्रेरणा आईपासून मिळाली. माझ्या पणजींनी नऊ मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. पणजी मोठ्या कुंकवाची आजी म्हणून मला आजही तिची आठवण येते. माझी पत्नी कल्पना दास स्त्री सशक्तीकरणासाठी काम करत आहे. आम्ही दोन मुलींना दहा वर्षापूर्वी दत्तक घेतले. त्या मुलींकडे पहावून मला मार्ग मिळतो. मी पुर्वजांमुळे आज इथपर्यत आलो आहे. दहा वर्षानंतर गावाला आलो.
‘आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु’ या संत ज्ञानेश्वर यांच्या ओवीतून गावकऱ्यांचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी व्यक्त केला. गावकऱ्यांच्या सन्मानाने आपण भारावून गेले आहोत, असे त्यांनी म्हटले. काळ बदलतोय तसं आपण काळाबरोबर बदलतोय तशीच गावची प्रगती झाली आहे.