लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. युती अन् आघाड्यांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक बोलणी केली जात आहे. लहान पक्ष आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. बच्चू कडू यांनी सांगितले की, १९ तारखेला महायुती सरकारला आमच्या मागण्याचे निवेदन देणार आहोत. सरकारने आमच्या मागण्या केल्या तर माझी विधानसभा निवडणुकीतून माघार असणार आहे. माझी जागा महायुतीला देणार आहे.
मी महायुती मध्ये नाही. कोणी सांगितले तुम्हाला मी महायुतीमध्ये आहे. आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहे.
पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमीमधून करावी, 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांच्या शेतमालास भाव द्यावा, दिव्यांगांना दरमहिना मानधन द्यावे, गरीब व श्रीमंतामधील विषमता वाढत चालली त्यात समता आणावी या मागण्या सरकारकडे करणार आहे. त्यासाठी १९ जुलै रोजी सरकारला निवेदन देण्यात येणार आहे.
महाविकास आघाडी व महायुती हे दोन्ही घटक पक्ष छोट्या पक्षांना संपवण्याचे काम सध्या सुरू केले आहेत. लोकसभेमध्ये मला उबाटा गटाने पाठिंबा दिला नाही. आम्ही छोटे-मोठे पक्ष एकत्रित येऊन एक नंबरची आघाडी करू. बच्चू कडू हे माझे चांगले मित्र आहेत ते जर आले तर त्यांच्यासोबत आम्ही आघाडी करू, असे स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
छोट्या- मोठ्या पक्षांना किंवा संघटनांना संपवायचे मोठ्या पक्षांची पर्याय व्यवस्था तयार करून ठेवण्याची प्रवृत्ती आहे. छोट्या मोठ्या पक्षांची अशीच कुचंबना होत असते. स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्यावेळेला महायुतीमध्ये होती त्यावेळेला आमची परिस्थिती काय झाली. रस्त्यावरची लढाई छोटे पक्ष लढत असतात. तिसरी आघाडी बिघाडी आमच्या डोक्यात काही नाही छोट्या पक्षांचे आमदार वाढवणे हेच आमच्यासमोर सध्या उद्दिष्ट आहे. तिसरी आघाडी म्हणजे थोतांड आहे. यामुळे विधानसभेला बच्चू कडू आणि मी एकत्रित येऊ शकतो राजू शेट्टी यांनी म्हटले.