संजय सरोदे, जालना, दि.19 डिसेंबर | मराठा आरक्षण राज्य सरकारने 24 डिसेंबरपर्यंतच दिले पाहिजे. या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आता यासंदर्भात कोणतेही बाकीचे बहाणे आम्हाला चालणार नाही. आतापर्यंत या विषयावर सरकारने काम चांगले केले आहे. न्या. शिंदे समितीकडूनही चांगले काम झाले आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, हे देखील सिद्ध झाले आहे. यामुळे मागासवर्ग आयोगाचा अहवाल तुम्हाला कशासाठी पाहिजे? मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्यायचे असतात. तसेच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही. तुम्ही हवे तर अधिवेशन पुढे अजून आठ दिवस वाढवा. 24 डिसेंबरपर्यंत असणारे अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत अधिवेशन करा, पण आरक्षणावर निर्णय घ्या, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगितले. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी विविध मुद्यांची मांडणी केली.
24 डिसेंबरच्या पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळ मागण्याची शक्यता नाही. त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पाठबळ आहे. त्यामुळे शंभर टक्के मराठांना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणार आहे. आता सर्व पुरावे असताना विनाकारण बहाने सांगू नये. त्या लोकांचे ऐकूण तुम्हाला मराठ्यांवर अन्याय करायचा आहे का? त्यांचे एकूण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचे वाटूळ करणार असाल तर परिणाम वेगळे होतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांचे ऐकून जर तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर सहा कोटी मराठ्यांची नाराजगी ओढून घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तोडगा आहे. त्यांचे हे सोल्यूशन आपण ऐकण्यास तयार आहोत. ऋषिकेश बेंद्रे कधीही नाराज होऊ शकत नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा संवाद यात्रेत 20 ते 23 असा चार दिवस दौरा असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बदनापूर सेलू रेनापुर गंगाखेड आणि बीड असा आहे वीसला गेवराईत आहे.