बीड : बीडमध्ये आज बस स्थानकात एक संशयास्पद बॅग (Suspicious Bag) आढळल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे बस स्थानक (Bus Depot) परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बॉम्बशोधक पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. सर्व परिसर खाली करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने बॅग हाताळली. मात्र बॅग उघडून पाहिली असता बॅगमध्ये लहान बालकांचे कपडे निघाले अन् नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (An atmosphere of fear was created when a suspicious bag was found at a bus stand in Beed)
मराठवाड्यातील औरंगाबाद येथे आज मनसेची सभा आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच बीडच्या बसस्थानकात एक बॅग बेवारसपणे पडली असल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर बॅगेत बॉम्ब तर नाही ना या कल्पनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि कल्लोळ माजला. तात्काळ पोलिसांना या बेवारस बॅगेबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. बसस्थानक परिसरातील लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. परिसर मोकळा बॅगेची तपासणी केली असता आता लहान बालकांचे कपडे निघाले. यानंतर नागरिकांसह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (An atmosphere of fear was created when a suspicious bag was found at a bus stand in Beed)