परळीत रासपच्या युवक प्रदेशाध्यक्षावर जीवघेणा हल्ला, भयानक हिंसाचार, नेमकं काय घडलं?

| Updated on: Dec 19, 2022 | 6:29 PM

परळीच्या शिवाजी चौकात संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्या गाडीवरही हल्ला झालाय.

परळीत रासपच्या युवक प्रदेशाध्यक्षावर जीवघेणा हल्ला, भयानक हिंसाचार, नेमकं काय घडलं?
Follow us on

संभाजी मुंडे, बीड : परळीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात तुफान राडा झाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्यावर यावेळी जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. राजाभाऊ फड हे रासप नेते आणि विधान परिषदेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावाई आहेत.

परळीच्या शिवाजी चौकात संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्या गाडीवरही हल्ला झालाय. तसेच त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

या गाडीत राजाभाऊ यांचा बॉडीगार्ड आणि त्यांचा पुतणा देखील होता. राजाभाऊ यांच्या बॉडीगार्डवरही हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या हल्ल्यात राजाभाऊ फड जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

या घटनेदरम्यान खुर्च्याची तोडफोड करण्यात आलीय. कदाचित हाणामारीत खुर्च्यांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

संबंधित घटना नेमकी का घडली? याबद्दलची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.