बीडः राज्यभरातील महिला कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या महिलांसाठी कमल सखी मंचाची स्थापना केली आहे. या माध्यमातून राज्यभरातील महिला मैत्रिणी जोडल्या जातील आणि मैत्रिणींना मदत करण्याचे काम या उपक्रमामार्फत केले जाईल, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
पंकजा मुंडे यांनी कमल सखी मंचाविषयी अधिक माहिती देताना म्हटले की, मी अनेक वर्षांपासून विविध कार्यकर्त्यांच्या घरी जाते. त्यावेळी घरातील महिला चहा-पाण्यातच व्यग्र असतात. पण या महिलाही माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांना एका मंचावर जोडण्याचा यामागे हेतू आहे. महिलांनी स्वतःचा फोटो, शिक्षण, नाव आदी माहिती याअंतर्गत नोंदवायची आहे. याद्वारे माझ्याकडेही 4-5 हजार मैत्रिणींचा संचय होईल. याद्वारे आम्ही महिलांना आधार देण्याचा प्रयत्न करू. यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. या मंचाद्वारे हळदी कुंकू, एकत्र गप्पा, असे कार्यक्रम घेतले जातील,’ अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
या कमल सखी मंचात नोंदणी करण्यासाठी मी स्वतः घरोघरी जाऊन कार्यकर्त्या महिलांशी संपर्क साधेन. त्यांनीही मोकळेपणाने आपल्या अडचणी सांगाव्यात. या माध्यमातून अडचणींचं निरसन होईल, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
इतर बातम्या-