बीड : अख्ख्या बीडमध्ये धनुभाऊंची अर्थात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे (Dhananjay Munde) यांची क्रेझ काही कमी नाही. आपल्या कार्यकर्त्यांसाठीही धनंजय मुंडेही प्रत्येक उपक्रमात भाग घ्यायला जराही मागेपुढे पाहत नाहीत. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये आपली हजेरी लावणं असेल, दिलखुलास अंदाजात लग्नाच्या वरातीत नाचणं (Wedding Dance of Dhananjay Munde) असेल, किंवा मग झाडावर चढलेल्या आंदोलन महिलांसाठी सोबतच्या आमदारालही झाडावर चढून त्यांची समजूत काढायला भाग पाडणं असेल, असे कितीतरी किस्से धनंजय मुंडे यांच्याबद्दल सांगितले जाऊ शकतात. या सगळ्या किस्स्यांमध्ये आता आणखी एका किस्स्याची भर पडली आहे. एका क्रिकेट सामन्यात (Cricket Match) धनंजय मुडे यांनी भाग घेतला. ओपनिंग बॅट्समन झालेल्या धनंजय मुंडे यांची फटकेबाजी यावेळी उपस्थितांनी अनुभवली.
परळीमध्ये क्रिकेट टुर्नामेन्टचं आयोजन करण्यात आलं होतं. परळीत सुरु असलेल्या सरपंच प्रीमियर लीगचा अंतिम सामना आज होणार होता. या सामन्यासाठी धनंजय मुंडे यांचीही हजेरी सगळ्यांची आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. यावेळी धनंजय मुंडे यांनी फक्त टुर्नामेन्टला हजेरीच लावली नाही, तर सामन्यात भाग घेत ओपनिंग बॅट्समन म्हणून क्रिकेट खेळत सगळ्यांची मनं जिंकली.
ओपनिंग बॅटिंगसाठी उतरलेल्या धनंजय मुंडे यांनी स्फोटक फलंदाजी केली. 7 चेंडूमध्ये 11 धावा कुटणाऱ्या धनंजय मुंडे यांची बॅटिंग पाहून कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला. जवळपास 15 मिनिटं रंगलेल्या सामन्यात धनंजय मुंडेवर सगळ्यांची नजर होती.
परळी तहसील कार्यालयासमोर या टुर्नामेन्टचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रांती मैदानात सरपंच प्रिमीयर लीगची फायनल मॅच सुरु होती. या सामन्यात धनंजय मुंडे यांनी 11 धावा केल्यात. 4 चौकार आणि तीन डॉट बॉलनंतर धनंजय मुंडे यांची विकेट गेली. राजकीय मैदान गाजवणाऱ्या धनंजय मुडे यांची खरीखुरी बॅटिंग पाहण्यासाठी क्रीडा चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
‘भाऊ.. भाऊ.. काय नाचायलाय धनुभाऊ!’ Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, भाऊ सुपर से भी उपर
शाळांपाठोपाठ वसतिगृहेही सुरु होणार, धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला आदेश