“केलेलं पाप बाहेर येईल या भीतीनं ईडीच्या कारवाईवर आरोप”;विरोधकांच्या टीकेला भाजपचं उत्तर

| Updated on: Mar 11, 2023 | 9:19 PM

अडीच वर्षे महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले आहे. त्यामुळे जो कोणी भ्रष्टाचारी असेल त्याला उत्तर हे द्यावेच लागेल अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिल आहे.

केलेलं पाप बाहेर येईल या भीतीनं ईडीच्या कारवाईवर आरोप;विरोधकांच्या टीकेला भाजपचं उत्तर
Follow us on

बीड : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे श्रावणबाळ अशी ओळख असणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आज ईडीकडून दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे राजकारण आता राज्यात रंगात आले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी गटाकडून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बीडमधील भाजपच्या नेत्यांनी मात्र विरोधकांवरच पलटवार करत विरोधकांकडून भ्रष्टाचारांना पाठिशी घालण्याचे काम सुरु असल्याची टीका करण्यात आली आहे.

भाजपचे बीडचे नेते प्रवीण घुगे यांनी नाना पटोले यांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की, नाना पटोले यांच्याकडून भ्रष्टाचारी नेत्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे.

YouTube video player

मात्र ईडीसारख्या संस्था या स्वायत्त असून त्या आपापले काम करत आहेत. जो कोणी भ्रष्टाचारी असेल त्याच्यावर कारवाई ही होणारच अशा शब्दात पलटवार करण्यात आला आहे.

यावेळी प्रवीण घुगे यांनी सांगितले की, देशासह राज्यातल्या तपास संस्था स्वायत्त आहेत.चौकशी आणि कारवाई ही हे ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत.

मात्र स्वतःच्या अंगावरती विषय आल्यानंतर विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याची टीका केली आहे. त्यामुळे विरोधकांकडून त्यांनी केलेली पापं बाहेर येतं आहेत त्याच्या भीतीने हे सरकारवर आरोप केले जात असल्याची टीका केली जात आहे. यावेळी भाजपच्या नेत्यानी सांगितले आहे की, आगामी काळातदेखील त्या संस्था निष्पक्षपणे काम करत राहतील.

मग चोर कुठलाही आणि कोणीही असो त्या प्रत्येकाला जो कोणी जनतेचा पैसा खाल्लेला आहे त्याला उत्तर हे द्यावे लागेलच असा टोलाही त्यांनी विरोधकांनी लगावला आहे.

प्रवीण घुगे यांनी विरोधकांवर पलटवार करताना म्हणाले की, नाना पटोले हे देखील या विषयाचे राजकारण करत आहेत. तसेच ते भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचाही प्रयत्न करत आहेत.

अडीच वर्षे महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले आहे. त्यामुळे जो कोणी भ्रष्टाचारी असेल त्याला उत्तर हे द्यावेच लागेल अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिल आहे.

तर राजेंद्र मस्के यांना जयदत्त क्षीरसागर यांच्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, ते सध्या कुठल्याही राष्ट्रीय पक्षात नाहीत.

ते ज्या पक्षामध्ये होते त्यांची तिथून हकालपट्टी करण्यात आली आहे. जयदत्त क्षीरसागर हे संधीसाधू नेते असून कोणाचेही सरकार असले की त्याठिकाणी फायदा घेण्याची क्षीरसागर यांची सवय असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.