Beed : ही निवडणूक काळी निवडणूक, ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

| Updated on: Dec 18, 2021 | 7:55 PM

राज्यात होणारी नगरपंचायत निवडणूक (Nagar Panchayat Election) ही काळी निवडणूक आहे. ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)चा इम्पिरिकल डाटा (Empirical Data) या महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi Government)नं दिला पाहिजे, असे पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

Beed : ही निवडणूक काळी निवडणूक, ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
बाबासाहेब पुरंदरे यांना भाजपा नेत्या पंकजा मुंडेंकडून आदरांजली
Follow us on

बीड : राज्यात होऊ घातलेली नगरपंचायत निवडणूक (Nagar Panchayat Election) ही काळी निवडणूक आहे. ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)बद्दलचा इम्पिरिकल डाटा (Empirical Data) या महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)नं दिला पाहिजे. येणाऱ्या 26 जानेवारीपासून याच अनुषंगानं महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं आहे.

‘महाराष्ट्र दौरा करणार’
आष्टी नगरपंचायत निवडणूक प्रचारसभापंकजा पुढे म्हणाल्या, की ओबीसी आरक्षणासह मराठा आरक्षणाबद्दलचाही डाटा राज्य सरकारनं दिला पाहिजे. आष्टी येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. याप्रश्नी आता महाराष्ट्र दौरा करणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या वेळी व्यासपीठावर भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणावरून टीकास्त्र
राज्य सरकारनं मागच्या काही दिवसांत वेळ घालवला. आतापर्यंत काम केलं असतं तर अशी वेळ आली नसती. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होत आहेत. हा ओबीसींवर अन्याय आहे. एक तर डाटा गोळा करायला हवा होता, अन्यथा निवडणुका डाटा मिळेपर्यंत पुढे ढकलायला हव्या होत्या. असं काहीही सरकारनं केलं नाही. त्यामुळे आता होणारी ही निवडणूक काळी निवडणूक असल्याचं त्या म्हणाल्या.

‘न्याय नाही’

कालही ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंनी टीका केली होती. काल भाजपा(BJP)च्या शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. ओबीसींनी ओपन(Open)मध्ये अर्ज भरले नाहीत, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले. निवडणुका घ्यायच्याच असतील तर आरक्षण देऊन घ्या, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली होती. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर(Pravin Darekar), आशिष शेलार(Ashish Shelar)ही होते.

या गुन्हेगाराची भलतीच थिअरी, घरातच लपवायचा केलेली चोरी; 37 व्या वर्षात 37 गुन्हे असलेला चोर अखेर जेरबंद

ठाण्यात फुले दाम्पत्याचे स्मारक उभारणार; महासभेत सभागृह नेत्यांचा प्रस्ताव

Attack on Shiv Sena Activist | शिवसेना कार्यकर्त्यावर कणकवलीत तलवारीनं हल्ला! हल्ल्यामागे राणेंचा हात?