मोठी बातमी! बीडमध्ये भाजप आमदाराच्या पत्नीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

| Updated on: Oct 21, 2023 | 7:34 PM

बीडमधून एक मोठी बातमी समोर आलीय. भाजप आमदाराच्या पत्नीविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप आमदाराच्या पत्नीसह आणखी दोघांवर हा गुन्हा दाखल झालाय.

मोठी बातमी! बीडमध्ये भाजप आमदाराच्या पत्नीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Follow us on

महेंद्रकुमार मुधोळकर, Tv9 मराठी, बीड | 21 ऑक्टोबर 2023 : बीडमधून एक मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये एका भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदाराच्या पत्नीसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या बड्या आमदाराच्या पत्नीचं या गुन्ह्यात नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आमदाराच्या पत्नीवर साधासुधा गुन्हा नाही तर चक्क अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. आमदाराच्या पत्नीकडून आदिवासी पारधी शेतकरी कुटुंबाला धमकविल्याचा आरोप करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झालाय. सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल झालाय. आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील आदिवासी पारधी शेतकरी कुटुंबाला धमकाविल्याच्या आरोपावरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीचा गुन्ह्यात समवेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आष्टी पोलिसात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणवार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिलीय. हा गुन्हा खोटा असून राजकीय दबावापोटी दाखल झाला आहे. याप्रकरणी वेळ आल्यावर मी माध्यमांना बोलणार आहे, असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे.