बीड : गाडी नो पार्किंगमध्ये (No Parking) लागली, की ती ‘टो’ होण्याची भीती असतेच. पण आपल्याकडे अनेकजण या भीतीच्या पलिकडे गेले आहेत. वारंवार सांगूनही बेशिस्तपणे गाड्या पार्क करण्याचे प्रताप आपल्या आजूबाजूला होताना सहज दिसतील. त्यासाठी फार शोधाशोध करण्याची गरज नाही. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना आवरण्यासाठी काहीतरी करायला तर हवं! फक्त गाडी ‘टो’ करुन, दंडांच्या पावत्या भाडून बेशिस्त पार्किग करणारे ताळावर येण्याची शक्यता कधीचीच संपुष्टात आली आहे. अशावेळी काहीतरी नवं करण्याची गरज आहे. क्रिएटीव्ह (Creative) करण्याची गरज आहे. महत्त्वाची म्हणजे यासाठी जबरदस्त क्रिएटिव्हिडी बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी (Beed District Hospital) लावली आहे.
काय केलंय त्यांनी?
इतर जिल्ह्यांमध्ये असतं तसंच बीडमध्ये एक जिल्हा रुग्णालय आहे. रुग्णालय म्हटलं तिथं रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक हे येणारच. तसे ते बीडच्या रुग्णालयातही येतातच! गर्दीही होते. कधीकधी गर्दी रुग्णांपेक्षा त्यांना भेटायला येणाऱ्यांचीच जास्त होऊन जाते. येता येता गाड्या घेऊन येणारे नातेवाईक कुठंही गाड्या पार्क करतात. त्यामुळे रुग्णालय परिसरात गर्दी होऊन जाते.
आता ही गर्दीची समस्या सोडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं जिल्हा शल्य चिकित्सक असलेल्या डॉ. सुरेश साबळेंना वाटलं. त्यासाठी त्यांनी थोडा डोक्याला ताण दिला. अखेर बेशिस्तपणे वाहनं पार्क करणाऱ्यांच्या गाड्यांची हवाच काढून टाका, असं फर्मान त्यांनी काढलं. आता आदेश निघाला म्हणजे लगेचच त्याची अंमलबजावणी होतेच असंही नाही. पण इथं डॉ. साबळेंनी काढलेल्या फर्मानावर एक्शनही घेण्यास सुरुवात झाली. कारण डॉ. साबळे यांनी स्वतः उभं राहून जातीनं ही कारवाई करुन घेतली.
आता या ताबडतोड कारवाईनंतर चालकांच्या डोक्यातील बेशिस्त हवा निघते का, हे पाहावं लागेल. त्यासाठी थोडा वेळही जाऊ द्यावा लागेल. पण ही शक्कल बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना काहीही ताळावर आणेल, असा विश्वास डॉ. साबळेंना वाटतोय.
इतरांनाही आदर्श घ्यायला काय हरकत?
बीडच्या जिल्हा रुग्णालयाबाहेर जे केलं जातंय, ते चांगलंय की वाईटय, हा वेगळा विषय आहे. पण जर बेशिस्तीला चाप बसणार असेल, तर पावत्या फाडण्यापेक्षा आणि टो होण्यापेक्षा बेशिस्त चालकांना ठिकाणावर आणण्यासाठी हवा काढणं, हा पर्यायही विचारात घ्यायला काय हरकत आहे? एकतर हवा काढल्यानंतर गाडी काढता येणार नाही आणि दुसरं म्हणजे एकदा हवा गेल्याचं कारण कळलं, तर नंतर पुन्हा अशी विचित्र गाडी पार्क करण्याचं धाडस शक्यतो कुणी करणारही नाही!
इतर बातम्या –
Drishyam च्या दिग्दर्शकाच्या घरी शानदार इलेक्ट्रिक कारची एंट्री, जाणून घ्या कारची खासियत
Reliance Jio: जुन्या नव्हे कमी किंमतीत खरेदी करा Jio चे प्रीपेड प्लॅन्स
तुमच्याकडे कार आहे का? महिन्याला कमवा 20 ते 30 हजार; कसे ते वाचा…