Sharad Pawar | ‘आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना…’ सक्षणा सलगर यांचा जोरदार हल्लाबोल

| Updated on: Aug 17, 2023 | 3:50 PM

Sharad Pawar | हे रणांगण आहे. या रणांगणात तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण का भारवला आहे? 65 वर्षाचा सह्याद्री आम्ही असा तसा रिटायर होऊ देणार नाही" असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

Sharad Pawar | आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना... सक्षणा सलगर यांचा जोरदार हल्लाबोल
sakshna salgar
Follow us on

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसची आज बीडमध्ये सभा सुरु आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सक्षणा सलगर यांनी आक्रमक भाषण केलं. “आज ऐतिहासिक अशी सभा बीड जिल्ह्यात होत आहे. मी लहानपणापासून ऐकलय पवारसाहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा. सगळे पवारसाहेबांच वय काढतात, पण एका कवीने लिहून ठेवलय की, “आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. विचार बाकी आहे” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

“पवार साहेब आम्ही तरुण मंडळी आहोत. हे रणांगण आहे. या रणांगणात तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण का भारवला आहे? 65 वर्षाचा सह्याद्री आम्ही असा तसा रिटायर होऊ देणार नाही” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

‘भलेभले हबाडा घेऊन घरी बसणार’

“जे फलक लावतायात ना आमच्या माणसाला साथ द्या, आमचा माणूस कामाचा, आता कामाचा माणूस की लबाड हे जनता ठरवेल. लबाडाला हबाडा बीड जिल्हा देणार. भलेभले हबाडा घेऊन घरी बसणार आहेत, हे सांगण्यासाठी ही सभा आहे” असं सक्षणा सलगर यांनी सांगितलं.

गुजरात महाराष्ट्राला चालवू शकत नाही

“भाजपाला मला सांगायच आहे की, आजपर्यंत ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत होता. त्या सगळ्या लोकांना घेऊन स्वच्छ करुन टाकलत. सबकी पसंद भाजप असं झालय. पण मी एक गोष्ट सांगते, गुजरात महाराष्ट्राला चालवत असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही. आमचा सह्याद्री अजून जिवंत आहे. दिल्लीला धडकण्याची ताकत महाराष्ट्राला शिवरायांनी, आंबेडकर, शाहू -फुलेंनी दिलीय” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या हाती द्यायची नाही

“निवडणूका येतात जातात, महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या हाती द्यायची नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदी-शाह यांना धडा शिकवला, तसाच महाराष्ट्र हा वीरांचा-शूरांचा आहे. या मातीतील माणूस कणखर आहे. हा स्वाभिमान, अस्मिता जपण्यासाठी पवारांना संधी द्यायची आहे” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.