बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बीडमध्ये आले. बीडमध्ये शरद पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. बीडमध्ये शरद पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रसमधील अजित पवार यांच्या बंडानंतरची शरद पवार यांची बीडमधली ही पहिलीच सभा होती. शरद पवार आजच्या सभेत काय बोलतात? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता होती. कारण शरद पवार मागच्या आठवड्यात त्यांचे पुतणे अजित पवार यांना भेटले होते. त्यावरुन मोठ्या प्रमाणावर शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल राजकीय संभ्रम निर्माण करण्यात आला. त्यामुळे शरद पवार काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाते लक्ष लागलं होतं. अखेर शरद पवार यांनी बीडमध्ये आपल्या बीडच्या काही नेत्यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा इशारा देत खडेबोलही सुनावलं. तसेच त्यांनी भाजपवर प्रचंड घणाघात केला.
बीड | शरद पवार यांनी बीडमधील सभेतून अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामील झालेल्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. “बीड जिल्ह्यातील नेता पक्ष सोडून गेला. त्यावर एकाने त्याला विचारले तुम्ही पक्ष का सोडला? त्यावर त्याने सांगितले साहेबांचे वय झाले.मी म्हणतो तुम्ही माझे काय पाहिले म्हणून म्हणताय माझे वय झाले”, अशी खोचक टीका पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली.
बीड | “पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा येईन असं सांगितलं, पण महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते ते पण असंच म्हणत होते. मला मोदींना सांगायचं आहे की, पुन्हा येण्यापूर्वी माझं सांगणं आहे की देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घ्या”, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मोदींवर केली. पवार बीडमध्ये बोलत होते.
बीड | “सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. कष्ट करणाऱ्यांचं हित बघितलं जात नाही. सरकारची समाजात अंतर वाढवण्याची निती आहे”, अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारवर टीका केली. शरद पवार बीडमध्ये बोलत होते.
शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे :
बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, इथली उपस्थिती बघितली, मला जुन्या काळाची आठवण झाली. ती जुन्या काळाची आठवण, लोकांमध्ये राहणारी व्यक्ती किंवा नेतृत्व ही निष्ठेच्या बाबतीत तडजोड करत असेल तर जनता त्यांच्या पाठीमागे राहते. अनेक वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होतो, त्यावेळी असा प्रसंग आला, महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतरावजी चव्हाण यांच्याकडे आम्ही सर्वजण त्यांच्या विचाराने काम करत होतो. त्यावेळी असा एक काळ येऊन गेला, खऱ्या नेतृत्वासारखी एक वेगळी भूमिका काही लोकांनी मांडायला सुरुवात केली. सामान्य लोक अस्वस्थ होते. पण या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे नेतृत्व केशरकाकू क्षीरसारगर यांच्याकडे होतं. काकूंनी भूमिका घेतली, कोणी काहीही भूमिका घेतली तरी नेत्याच्या विरोधात तडजोड करणार नाही. त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली, तरी मी माघार घेणार नाही. ती स्थिती आज त्यांच्या नातूने या ठिकाणी आणली याचा मला अतिशय आनंद आहे.
जयंत पाटील यांच्या भाषणातील मुद्दे, नेमकं काय-काय म्हणाले?
– स्वाभिमानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. महाराज दिल्लीपुढे कधीही झुकले नाहीत
– त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज या दोघांनी देशाला सांगितले
– छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी करून स्वराज्य उभे केले. त्यांच्या चिरंजीवाने आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडून स्वराज्य टिकवण्याचा प्रयत्न केला
– विलासराव, गोपीनाथराव या सर्वांनी सुडाचे नाही तर प्रेमाचे राजकारण केले
– मात्र सध्या देशात आणि राज्यात सुडाचे राजकारण केले
– नवाब मलिक यांना आम्ही अडचणीत आणू इच्छित नाही. त्यामुळे ते निर्णय घेतील
– पवार साहेबांचे पोस्टर लावले मी त्यांचे आभार मानतो
– कारण त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कळवले की पवार साहेब येणार आहेत
CAG चा रिपोर्ट आला त्याने 7 मोठे घोटाळे समोर आणले
– द्वारका एक्सप्रेसची कॉस्ट 14 टक्के कशी वाढली असा सवाल CAG ने केला?
– आयुष्यमान भारत योजनेत अनेकांनी मोबाईल नंबर रजिस्टर करून भ्रष्टाचार केला
– मयताच्या टाळूवरचे लोणी कोण खातंय?
– देशातील टोल वरून 132 कोटी जास्तीचे घेतले गेले
– ज्यांची सुरुवात भ्रष्टाचाराला आळा घालण्याची होती त्याचा शेवट कसा होतोय हे आपण पाहतोय
अनिल देशमुख यांच्या भाषणातील मुद्दे :
– कापसाला 12 हजार भाव होता. मात्र यावर्षी पेरणीचा खर्चही निघाला नाही
– सरकारने कापसू आयात केला आणि कापसाचे भाव पडले
– त्यानंतरही सरकारने कापूस निर्यात केला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला.
– महाराष्ट्रत 19553 महिला आणि मुली गायब आहेत.
– ED, CBI चा वापर करून सरकार पाडले जात आहेत
– मी गृहमंत्री असताना मला खोट्या केसमध्ये फसवले
– ज्याने माझ्याविरोधात केस केली त्याचे पुरावे कोर्टात देऊ शकले नाहीत
– मला सांगितले गेले की समझौता कर लो
– मात्र मी नकार दिल्याने मला अडकवले
– 14 महिने मी आर्थर रोड जेलमध्ये भत्ता खाऊन आलो
– राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सोबत सहानुभूती आहे
– त्यामुळे लोक संधी देतील
– स्वतःच्या बळावर भाजपची सत्ता येत नाही हे लक्षात आल्यावर वर्षभरापासून प्रयत्न सुरु केला
– सुरवातीला शिवसेना फोडली आणि पन्नास खोके एकदम ओके झाले हे पाहिले
– यावेळी राष्ट्रवादीवर प्रयोग केला..
– मात्र तरीही जनता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे
– फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे
रोहित पवार यांच्या भाषणातील मुद्दे :
– एकीकडे सत्ता आणि दुसरीकडे विचार आहे
– आम्ही विचारसोबत आहोत
– उद्या कदाचित आम्हाला खोट्या केसमध्ये अडकवले जाईल. मात्र तरीही आम्ही घाबरणार नाही
– महाराष्ट्राचा सह्याद्री कधीही दिल्लीपुढे झुकत नाही