बीडः राज्य शासनात विलीनीकरणासाठी सध्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरु आहे. यामुळे लहान मोठ्यांसह सर्वच प्रवाशांचे हाल होत आहेत. या संपाचा फटका अनेकांना बसत असून ग्रामीण पातळीवर गंभीर परिणामही पहायला मिळत आहेत. संपाचे परिणाम दाखवणारे बीडमधील (Beed District) पाटोदा तालुक्यातील सौताडा गावातील विद्यार्थ्यांचे (School student) हे बोलके चित्र. दिवाळीच्या सुट्यांनतर येथील शाळा सुरु झाल्या. सौताड्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील जामखेड येथील शालेत जातात. एरवी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी एसटी बसचा वापर करतात. मात्र सध्या एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठी अडचण उभी राहिली आहे. खासही वाहनांनी अशा प्रकारे प्रवास करणे विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे आता तरी हा संप, यातील राजकारण थांबावं, अशी लोकभावना आहे.
एसटी बस सुरु नसल्याने गावोगावच्या विद्यार्थ्यांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी फारशी वाहने नव्हती. उशीर होत असल्याने एका मालवाहू रिक्षात 25 ते 30 विद्यार्थी-विद्यार्थिनी दाटीवाटीने उभ्या होत्या.
अधिक गंभीर बाब म्हणजे जामखेडहून सौताड्याला जाताना पाच किमी अंतरावर तीव्र घाटरस्ता आहे. शिक्षणासाठी विद्यार्थी ही जोखी स्वीकारत असले तरीही प्रवासाचे हे दृश्य पालकांची चिंता वाढवणारे आहे. राज्यात 35 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एसटी बसचा वापर करतात. मात्र सध्या सुरु असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांनी शिकण्यासाठी शाळेत जावे की नाही, हा प्रश्न आहे.
इतर बातम्या-