कळंबमधील त्या मृत महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध काय? पहिल्यांदाच समोर आली महत्त्वाची माहिती

| Updated on: Mar 31, 2025 | 7:21 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर येत आहेत.

कळंबमधील त्या मृत महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध काय? पहिल्यांदाच समोर आली महत्त्वाची माहिती
santosh deshmukh
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणात अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. कळंब शहरामध्ये एका घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.  मनीषा कारभारी बिडवे असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेचा वापर संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी करण्यात येणार होता असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून करण्यात आला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या महिलेचा खरच संतोष देशमुख प्रकरणाशी काही संबंध होता का? या संदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले पवार? 

कळंबमध्ये जी महिला मृत अवस्थेमध्ये आढळून आली, तपासाअंती तिचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी अद्याप कोणताही संबंध आढळून आलेला नाहीये. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, जर या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही संबंध आढळला तर त्याची माहिती दिली जाईल.

मनिषा कारभारी बिडवे असं या महिलेचं नाव आहे, तिची हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महीलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत, आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आले असून, लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपीला पकडलं जाईल असं संजय पवार यांनी म्हटलं आहे.

काय आहे अंजली दमानिया यांचा आरोप?  

कळंब शहरामध्ये एका घरात या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचा वापर संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी करण्यात येणार होता असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा यांचा मृतदेह घरात ५ ते ६ दिवसांपासून पडून होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर हा प्रकार समोर आला.