Marathi News Maharashtra Before the elections, the pre campaign verbal trailer from Dharamveer 2 movie is launched
निवडणुकीआधी धर्मवीर टू सिनेमावरुन प्रचाराआधीचा शाब्दिक ट्रेलर सुरु
Follow us on
धर्मवीर टू चित्रपटाच्या ग्रँड प्रिमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली आणि आता धर्मवीर 3 जेव्हा येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार हेही फडणवीसांनी सांगितलं.
फडणवीसांनी धर्मवीर तीनची पटकथा लिहिणार असल्याचं म्हणताच राऊतांनी अमित शाहांवरुन निशाणा साधला. महाराष्ट्र लुटायला जे औरंगजेब येत आहेत, त्यांच्यावर फडणवीसांनी चित्रपट काढावा अशी टीका राऊतांनी केली.
दिवंगत धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपट मे 2022 मध्ये आला होता. ज्यात दिघेंनी ठाण्यात वाढवलेली शिवसेना आणि सर्वसामान्यांना कसा न्याय दिला हे दाखवलं होतं. आता धर्मवीर 2 मध्ये, हिंदुत्वावरुन डायलॉग असून एकनाथ शिंदेंनाही खास भूमिका आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडे 4 वर्षात वेगवेगळे एपिसोड आलेत…त्यावरुन रोज टीकेचे बाण सुटत असतात…आता निवडणुकीआधी धर्मवीर टू सिनेमावरुन प्रचाराआधीचा शाब्दिक ट्रेलर सुरु झालाय…