आमदार Raju Karemore 'जीम'च्या प्रेमात! Fitness सेंटरच्या उद्घाटनावेळी व्यायाम

आमदार Raju Karemore ‘जीम’च्या प्रेमात! Fitness सेंटरच्या उद्घाटनावेळी व्यायाम

| Updated on: Feb 11, 2022 | 4:19 PM

तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार (MLA) राजू कारेमोरे सध्याच्या घडीला चर्चेचा विषय बनले आहेत. ऑक्सिजन फिटनेस जीमच्या (Gym) उद्घाटन प्रसंगी आमदार राजू कारेमोरे यांना जीममध्ये व्यायाम करण्याचा मोह आवरला नाही.

तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार (MLA) राजू कारेमोरे सध्याच्या घडीला चर्चेचा विषय बनले आहेत. काही दिवसा अगोदर मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी वाद घालतानाचा व्हिडिओ तुफान वायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणात त्यांना जेलची सुद्धा हवा खावी लागली होती. चार दिवसाअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कमलेश कनोजे यांच्या घरी लग्न समारंभात आमदार राजू कारेमोरे यांचा डान्स करतानाचा व्हिडिओसुद्धा चर्चेचा विषय बनला होता. त्याच दिवशी सायंकाळचा वेळी बांधकाम कंत्राटदारला शिवागाळी करताना आमदार राजू कारेमोरे हे मागे राहिले नाहीत. तेव्हासुद्धा राजू कारेमोरे चर्चेत राहिले होते. मोहाडी शहरातील युवा फिटनेस ट्रेनर विनय पेशने यांच्या ऑक्सिजन फिटनेस जीमच्या (Gym) उद्घाटन प्रसंगी आमदार राजू कारेमोरे यांना जीममध्ये व्यायाम करण्याचा मोह आवरला नाही. चक्क आमदार साहेबांनी जीममध्ये असलेल्या प्रत्येक सामुग्रीचा उपयोग करीत व्यायाम केला.