तेजस मोहतुरे, भंडारा : गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्याचा दावा शासनाकडून (Maharashtra government) केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी दिसत आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आंबागड (ambagad)येथे सातपुडा पर्वतरांगातील डोंगरावर गोंड राजा बख्त बुलंद शाह यांनी किल्ल्याची निर्मिती केली होती. इतिहासाची साक्ष देत असलेला या किल्ल्याच्या वापर महत्त्वाचे राजकीय कैदी ठेवण्यासाठी करण्यात आला होता. परंतु सध्या किल्ल्याची स्थिती बघता हा किल्ला स्वतः शिक्षा भोगत असल्याचे दिसून येत आहे.
तुमसरपासून 15 किलोमीटर, जिल्हा मुख्यालयापासून 45 किलोमीटर व राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरापासून 100 किलोमीटर अंतरावर आंबागड किल्ला आहे. या किल्ल्याची स्थापना 1690 मध्ये गोंड राजा बख्त बुलंद शाह यांनी केली होती. या किल्ल्याची जमिनीपासून उंची 1500 (460 मी) फूट इतकी आहे. या किल्ल्याच्या विस्तार दहा एकरात असून हा किल्ला डोंगरावर आहे. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडील टेकड्यात हा किल्ला आहे. गोंड सत्तेच्या अस्तानंतर आंबागड किल्ला नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर शेवटी इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला. या किल्ल्याची संरक्षण रचना बघता या परिसरातील हा एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला मानला जात होता. या किल्ल्यात महत्त्वाचे राजकीयकैदी ठेवले जात असत, अशी या इतिहासात नोंद आहे.
दरम्यान इतिहासात नोंद असलेल्या सद्धा प्रशासकिय दुर्लक्षतेमुळे हयगय होत आहे. किल्ल्याला ठीक ठिकाणी भेगा पडल्या असून पुरातत्व विभाग ही लक्ष द्यायला तयार नाही. आंबागड किल्ल्याला असलेला भुयारी मार्ग रामटेक येथे निघत असल्याचे सांगितले जात होते. परंतु त्याचे येथे अस्तित्व सद्धा दिसत नाही. वेळीच यांची काळजी न घेतल्यास हा किल्ल्या इतिहास जमा होईल असे येणारे पर्यटक सांगत आहे. दरम्यान या किल्लाचे पुनर्वसन करावे अशी मागणी ही पर्यटक करीत आहेत.