भंडारा : वर्चस्वाच्या वादात एका तरुणावर धारदार शस्त्राने (Sharp weapon) प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील युवराज बीअर बारमध्ये घडली. विशेष म्हणजे हल्लेखोर तरुण स्वत: मोहाडी ठाण्यात (Mohadi Thane) गेले. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. जखमीला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital at Bhandara) उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी दिनेश सायंकाळी मोहाडी येथील युवराज बीअर बारमध्ये गेला होता. त्याठिकाणी आरोपी सचिन व महेश आले. वर्चस्वाच्या लढाईत त्यांच्यात वाद झाला. या वादात सचिन व महेशने आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने दिनेशवर वार केले. यात त्याच्या मानेला आणि चेहऱ्याला जबर दुखापत झाली.
जखमी दिनेशला तात्काळ मोहाडी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथून भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमी व हल्लेखोर गुंड प्रवृत्तीचे आहेत. हल्ला केल्यानंतर सचिन व महेश थेट मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी आपण हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. जखमीच्या बयानानंतर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.
मोहाडीत युवराज बिअरबार आहे. याठिकाणी पिणारे बसत असतात. काल सायंकाळी दिनेशही तिथं गेला. त्याच बारमध्ये सचिन व महेश होते. यांच्यात जुना काही वाद होता. बारमध्ये हा वाद उफाळून आला. यात सचिन व महेशने दिनेशवर सपासप वार केले. यात दिनेश जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर सचिन व महेश मोहाडी पोलिसांत गेले. आम्ही दिनेशला मारहाण केल्याचं सांगितलं. त्यामुळं पोलिसांना त्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. इकडं दिनेश हा रुग्णालयात भरती आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. दिनेशला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.