जंगलातील वाघ १२ तासापासून शेतात, शेताची वाट कुणी धरेना

| Updated on: Feb 16, 2023 | 10:15 AM

मांडेसर शिवारात मिरचीच्या पिकात वाघ दिसला होता. सातत्याने वाघ दिसत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जंगलातील वाघ १२ तासापासून शेतात, शेताची वाट कुणी धरेना
Follow us on

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर व मोहाडी तालुक्यातील अनेक गावांत गेल्या महिन्यांपासून वाघ (Bhandara Tiger) हजेरी लावत आहे. वाघाच्या हजेरीने नागरिक प्रचंड दहशतीत (Terror) आहेत. सुकळी-रोहा येथे हरणाची शिकार करणारा वाघ शेतपरिसरातच (Shitshiwar) ठाण मांडून बसला आहे. रोहा येथील सहादेव गाढवे तर सुकळी येथील पृथ्वीराज राउत यांच्या शेतादरम्यान हा वाघ दिसतो. या वाघाला येथून हुसकावून लावण्यासाठी काल दिवसभर वनविभागाचे विशेष पथक गावात तळ ठोकून होते. पण त्यांना वाघाला येथून पळवून लावण्यात यश आले नाही. तुमसर व मोहाडी तालुक्यांमध्ये वाघ व बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चक्क शेतातच वाघ – बिबट्या ठाण मारून बसत आहेत. या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाघ पाहण्यासाठी गर्दी

तुमसर तालुक्यातील सुकळी शिवारात काही शेतकरी शेतीला पाणी देत होते. साडेदहाच्या सुमारास वाघाडी डरकाळी ऐकू आली. वाघ आले रे आला म्हणत गावकऱ्यांनी धूम ठोकली. वनविभागाचे पथक दाखल झाले. वाघ कुठं आहे म्हणून लोकं गर्दी करू लागले.

सुकळी येथील शेतकरी जसवंत सहारे यांना आधी वाघाची डरकाळी ऐकू आली. वाघाची वार्ता गावात पोहचताच नाल्याशेजारी वाघ पाहण्यासाठी गर्दी झाली.

नाल्यातील झुडूपात दिसला वाघ

वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. रहांगडाले यांच्या नेतृत्वात वनपथक पोहचले. कोका वन्यजीव विभागाचे पथकही तळ ठोकून होते. वनविभागाच्या पथकाने पाहणी केली. नाल्यातील झुडुपात वाघ असल्याचे त्यांना दिसले. वाघाला जेरबंद कसे करावे, असा प्रश्न त्यांना पडला. दुपारनंतर वाघ दिसेनासा झाला.

तुमसर, मोहाडी तालुक्यात वाघ दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. मांडेसर शिवारात मिरचीच्या पिकात वाघ दिसला होता. सातत्याने वाघ दिसत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शेतात जायचे कसे

मसर तालुक्यात नेहमीत वाघ दिसतो. पण, सुकळी शिवारात अद्याप दिसला नव्हता. आता शेतशिवारात वाघ दिसत असल्याने शेतकरी शेतात कसे जायचे असा प्रश्न विचारत आहेत. जवळचं वैनगंगा नदी वाहते. त्यामुळे या भागात वाघ जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतशिवारात रबी पिकांची लागवड केली आहे. रात्री शेताला पाणी देण्यासाठी जावे लागते. अशावेळी वाघाने हल्ला केल्यास काय होणार, या भीतीपोटी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.