भंडारा | 14 ऑक्टोबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवली सराटी गावात मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी राज्य सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यांच्या या अल्टिमेटम आणि भाषणावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केलीय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हाथ आहे, असं वक्तव्य सदावर्ते यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी उत्तर दिलं. सदावर्ते संशोधक, तज्ज्ञ आहेत. त्यांनी कोणत्या कॅमेरातून शरद पवार यांचे हाथ, पाय पाहिले ते सांगावं, अशी मिश्किल टीका बच्चू कडू यांनी केली.
मनोज जरंगे यांनी येवढ्या टोकाच्या भूमिकेत जाऊ नये. सरकार मराठ्याला आरक्षण देणार. यात काही शंका नाही आहे. “मनोज जरंगे यांनी येवढ्या टोकाच्या भूमिकेत जाऊ नये. सरकार मराठ्याला आरक्षण देणार. यात काही शंका नाही आहे. मराठा आरक्षणा संदर्भात शासन धोरण सुद्धा झालेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे. कोर्टात निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागला तर एका दिवसात मराठा आरक्षण मिळेल”, असं बच्चू कडू म्हणाले.
मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्यावे, अशी विनंती केलीय. पण त्यांच्या या भूमिकेवर ओबीसी नेत्यांचा आक्षेप आहे. ओबीसी समाजाकडून राज्यभरात या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावरदेखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी वाल्यांनी जो काही आड आणण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा आहे असं मला वाटतं, असं बच्चू कडू म्हणाले.
“देशामध्ये हजार जाती आहे. हजार जातींमध्ये दोन वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ते म्हणजे एक शेतकरी आणि दुसरा मजूर. 75 टक्के शेतकरी सर्व जातीत भेटतात अणि मजूर सुद्धा भेटतात. आरक्षण मागण्याची वेळ का आली? तर शेतीमालाला भाव नाही. शेती मालाला भाव मिळाला असता तर नोकरी कोणी मागितली नसती. सर्व सरकार हे फेल ठरले. अपयशी ठरले. शेती मालाला भाऊ देऊ शकले नाहीत. त्यांच्यामुळे आरक्षणाचे मुद्दे समोर येत आहेत”, असं बच्चू कडू म्हणाले.
“जाती जमातीमध्ये आरक्षणाशिवाय पर्याय नाही. नोकरी शिवाय दुसरी रोजगाराची संधी वाटत नाही. गेल्या 75 वर्षात सर्व सरकारने अपयश मिळवलं, जे शेतकऱ्यांच्या माथी मारलं. ओबीसीमध्ये माझ्या वडिलांच्या टीसीवर मराठा होतं. महसुली दप्तरी कुणबी आहे आणि मी मराठा सुद्धा आहे. मला कुणबी प्रमाणपत्र मिळालं कारण पंजाबराव देशमुख यांनी प्रचार केला की, मराठा वाल्यांनी कुणबी लिहा. माझ्या कुटुंबियांनी कुणबी लिहिलं म्हणून मी कुणबी झालो”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
“जे मराठे आहेत ते कुणबी, म्हणजे शेती करणारा हा कुणबी. मराठा हे एका जातीचे नाव नाही. तर या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्याला मराठा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धात औरंगजेबाचे वाक्य पाहिले तर तो म्हणायच्या कहा गये मराठे. 18 पगळ जातीमधले लोक म्हणजे मराठे होते. ती पदवी होती. जसे देशमुख आहेत, राजपूत , पाटील पदवी आहे तशीच मराठा ही पदवी होती. यात ओबीसी वाल्यांनी जे काही आड आणण्याचा प्रयत्न केला ते चुकीचा आहे असं मला वाटतं”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.