तेजस मोहतुरे
भंडारा : राज्यातील 139 नगरपंचायतीचे (Nagar Panchayat) आरक्षण जाहीर झाले. भंडारा जिल्हातील मोहाडी, लाखनी, लाखांदूर या तिन्ही नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले. मोहाडी अनुसूचित जमाती (महिला) आणि लाखनी येथे अनुसूचित जाती (महिला) राखीव, तर लाखांदूर येथे सर्वसाधारण खुला प्रवर्ग राखीव आरक्षण (Open Category Reservation) जाहीर झाले. त्यानंतर संभाव्य उमेदवारांनी आपली मोर्चेबांधणी (Morchebandhani) सुरू केली आहे. मोहाडी नगरपंचायतीमध्ये भाजपकडे 3 उमेदवार अनुसूचित जमाती (महिला) मधून निवडणूक आले आहेत. लाखनी नगरपंचायतीमध्ये भाजपकडे 1 तर काँग्रेसकडे 1 अनुसूचित जाती (महिला) मधून निवडून आले आहेत. लाखांदूर नगरपंचायत सर्वसाधारण राखीव आहे. तीनही नगरपंचायतींचा विचार केला तर मागील काळात मोहाडी नगरपंचायतीवर काँग्रेसचा एक हाती झेंडा होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेस मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.
आता या तिन्ही नगरपंचायतीमध्ये अध्यक्ष पदासाठी चुरस वाढणार आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. कोणत्या पक्षाचा अध्यक्ष बनेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नगरपंचायतींची पक्षीय स्थिती खालील प्रमाणे आहे. मोहाडी नगरपंचायतीमध्ये भाजप – 9, काँग्रेस -2, तर राष्ट्रवादी – 6 अशी स्थिती आहे. लाखनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी -8, काँग्रेस – 2, भाजप -6 तर, अपक्ष – 2 असे उमेदवार निवडूण आले आहेत. लाखांदूर नगरपंचायतीमध्ये भाजप -9, काँग्रेस – 6, अपक्ष -2 असे पक्षीय बलाबल निवडूण आले आहे. मोहाडी नगरपंचायतमध्ये अनुसूचित जमाती (महिला) प्रर्वगातील नगर अध्यक्ष बनणार आहे. भाजपचे नऊ उमेदवार निवडून आले आहेत. मात्र भाजपचे दोन गट असल्याने नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळात पडणार हे उत्सुकतेचे ठरणार आहे. यातील सहा उमेदवार हे चरण वाघमारे यांच्या गटाचे आहेत. तर इतर तीन दुसऱ्या गटाचे आहेत. त्यामुळं या दोन्ही गटांचे सूत जुळते की, ते राष्ट्रवादीला सोबत घेतात, हे पाहावे लागेल.
लाखनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार कामगिरी केली आहे. तर काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज आहे. भाजपाला मागील निवडणुकीपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागले आहे. लाखांदूर नगरपंचायतीवर पुन्हा भाजपाने आपला झेंडा रोवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुफळा साफ झाला. काँग्रेसने मागील निवडणुकीपेक्षा यावेळी चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्व जिल्ह्यात नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला पाहिजे तशी कामगिरी करता नाही आली. राष्ट्रवादी काँग्रसने जोरदार मुसंडी मारली. लाखनी नगरपंचायतमध्ये अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गातील नगराध्यक्ष बनणार आहे. लाखांदूर नगरपंचायतीमध्ये भाजपाने पुन्हा झेंडा रोवला आहे. तर नाना पटोले यांच्या तालुक्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. खाता न उघडल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे बोलले जात आहे.