तेजस मोहतुरे
भंडारा : जिल्ह्यातील नेरी या गावातील जयंत प्रल्हाद कारेमोरे (Jayant Pralhad Karemore) यांनी MPSC मध्ये घवघवित यश मिळवलं. RTO इंस्पेक्टर पदवर त्याला नियुक्त मिळाली. राज्य आयोगाच्या असिस्टंट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर (Assistant Motor Vehicle Inspector Regional Transport Officer) पदाकरिता त्याची निवड झाली. राज्यातील दीड लाख युवकांनी प्रीलिमरी परीक्षा दिली. पाच हजार युवकांची निवड मुख्य परीक्षेकरिता झाली. यात जयंत याने राज्यातून 24 वी रँक मिळविली. तो ओबीसी प्रवर्गातून राज्यातून तिसरा आला. विदर्भातील जयंत हा ओबीसी प्रवर्गातून पहिलाच ( Vidarbha the first from OBC category) विद्यार्थी ठरला आहे. जयंतला आई वडिलांचा मोठा आधार आहे. शिक्षणासाठी शेत व घर विकावे लागले तरी चालेल. पण प्रयत्न सोडायचे नाहीत, असा वडिलांनी धीर दिला. आईने शिक्षणासाठी गटातून पैसे उभे केले होते.
एवढेच नाही तर स्पर्धा परीक्षा शिकवणीकरिता मोठ्या बहिणीने लाख रुपये दिले. तरीही पैसे अपुरे पडत असल्याने जयंतने घरीच अभ्यास केला. संघर्षमय जीवनातून यश प्राप्त केले. जयंत याने वाचनालयातून पुस्तके आणली. MPSC तयारी सुरू ठेवली. दरम्यान त्याने वेळ वाया जाऊ म्हणून त्याने यूपीएससी दिली. मात्र काही गुणाने यश काही गुणांनी निसटले. पण त्याने धीर सोडला नाही.
राज्य आयोगाच्या जागाने अर्ज भरला परीक्षा दिली. दुसरीकडं जयंतची परीक्षेच्या कालावधीत नेहमी तब्येत बिघडायची. अशा कठीण प्रसंगी माजी सरपंच आनंद मलेवार नेहमी मदतीला धावून आले. आर्थिक मदतीसह त्याच्या उपचारासाठी मदत केली. संघर्षाच्या काळात अनेक प्रसंग जयंतला भेडसावत. मात्र जयंत काही डगमगला नाही. त्यानं आपला प्रवास सुरू ठेवला. अखेर त्याने ते यश मिळविले आहे.