भंडारा : मंत्री, नेते मंडळी कबड्डीच्या (Kabaddi) आखाड्यात उतरतात व्हा चर्चा रंगतेच. राजकीय मैदान गाजवणाऱ्यांना मैदानी खेळ जमणार का, राजकीय डावपेच खेळणाऱ्यांना मैदानी डावपेच जमणार का. या दृष्टीनं त्यावेळी बघितलं जातं. यापूर्वी देखील अनेक आमदार, खासदार, मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी कबड्डीच्या आखाड्यात उतरुन आपल्या कौशल्याची झलक दाखवली आहे. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. भंडारा (Bhandara) जिल्ह्यतील खासदार सुनील मेंढे (BJP MP Sunil Mendhe) यांचा हा व्हिडीओ आहे. भंडारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भाजप खासदार सुनील मेंढे यांनी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या महोत्सवात कबड्डी हा लोकप्रिय मैदानी खेळ देखील आहे. खासदार सुनील मेंढे यांचा याच महोत्सवातील कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ व्हायर (viral video) होतोय. यामध्ये ते कबड्डी खेळताना दिसतायेत. आता खासदार महोदय कबड्डीच्या आखाड्यात उतरणार तर चर्चा होणारच की.
गोंदिया भंडाऱ्याचे 53 वर्षीय खासदार सुनील मेंढे यांनी खासदार महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये खासदार सुनील मेढे हे सर्विस देण्यासाठी जातात. मात्र, त्यांना यावेळी कबड्डी खेळण्याचा मोह आवरत नाही. यावेळी हे खासदार महोदय रेड मारने, कॉर्नर खेलने असे डापेच आखून दोन प्रतिस्पर्धींना चितपट करतात. सुनील मेंढे यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत 53 वर्षीय खासदार फिट दिसत असून अनेकांनी त्यांचे कौतुकही केले आहे.
खासदार सुनील मेंढे यांचे राजकीय डावपेच सर्वांना माहित आहे. मात्र, त्यांना मैदानी खेळातही रस आहे. हे पहिल्यांदाच दिसून आलं आहे. मेंढे यांचे मैदानी खेळाचे डावपेच पाहून प्रतिस्पर्धी संघासह जिल्ह्यातील लोकांनाही सुखद धक्का बसलाय. 53 वर्षांचे खासदार महोदय अजूनही फिट असल्याचं त्यांना दिसून आलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला लोकांची चांगलीच पसंती दिली आहे. तर जिल्ह्यात हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून खासदार महोदयांच्या कबड्डीची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
इतर बातम्या