मुंबई : दरवर्षी आंबेडकरी जनता पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमा कोरेगाव शौर्यदिन (bhima koregaon shaurya din) उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील (Ajit Pawar) उपस्थित राहणार आहेत. यंदाचं विजयस्तंभ शौर्य दिनाचं 204 वं वर्ष असल्याने या सोहळ्याला खास महत्त्व आलेलं आहे. विजयस्तंभाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गर्दी न होऊ देण्याचे आवाहन जनतेला करण्यात आलं आहे.
पुणे : प्रशासनाच्या नियोजनाबद्दल आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली नाराजी
विजय स्तंभाच्या इथे आल्यावर एक प्रकारची ऊर्जा मिळते
हा इतिहास प्रेरक आहे
टोलनाक्यावर अनुयायांना खासगी गाड्यांमधून उतरवले जात आहे
तिथून पुढे जवळपास 6 ते 7 किलोमीटर अंतर पायी चालावे लागत आहे
आंबेडकरी जनतेचे मोठे हाल होत आहेत
थेट विजय स्तंभापर्यंत वाहनांची सोय करणे अपेक्षित आहे
ब्रेक : भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ( रावण ) आज पुणे दौऱ्यावर
भीमा कोरेगावमध्ये जाऊन करणार विजयस्तंभाला अभिवादन
यंदा भीम आर्मी संघटनेनं भीमा कोरेगावमध्ये सभा घेणार असल्याचं केलं होतं जाहीर
मात्र सभा, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलीये
भीम आर्मी सभा घेणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष
सकाळी दहा वाजता चंद्रशेखर आझाद यांच पुणे विमानतळावर होणार आगमन
कोरेगाव भीमा इथं शौर्यदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल
शौर्य दिनाला यंदा 204 वर्ष पूर्ण होत आहेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंधासह हा शौर्यदिन साजरा होतोय.
पुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा
यंदाचं विजयस्तंभ शौर्य दिनाचं 200 वं वर्ष
विजयस्तंभाला आकर्षक अशी रोषणाई
रात्रीपासूनचं अनुयायी विजयस्तंभ अभिवादनासाठी कोरेगाव भीमात दाखल
उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महत्वाचे मंत्री विजयस्तंभ अभिवादनास लावणार हजेरी