शरद पवारांची सर्वात मोठी रणनीती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह यांचा होणार पक्षप्रवेश

| Updated on: Apr 15, 2024 | 1:14 AM

शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणातला तेल लावलेला पैलवान असं म्हटलं जातं. त्यामागे कारणही अगदी तसं आहे. शरद पवार हे 83 वर्षांचे आहेत. पण या वयातही ते अतिशय बिकट अशा राजकीय परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. असं असलं तरीही शरद पवार यांनी हार मानलेला नाही. तसेच कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्यातून वाट काढत शरद पवार पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा अनुभव पाहता, त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक चढउतार पाहिले. याचा शरद पवार यांना फार फायदा होतोय. यातूनच शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी महायुतीला धक्क्यावर धक्के देताना दिसत आहेत.

शरद पवारांची सर्वात मोठी रणनीती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह यांचा होणार पक्षप्रवेश
भूषणसिंह होळकर आणि शरद पवार
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत मोहिते पाटील कुटुंबियांना आपल्या पक्षात समाविष्ट करुन भाजपला मोठा धक्का दिला आहे. या धक्क्यातून महायुती सावरत नाही तोच शरद पवार यांनी आणखी एक नामी शक्कल लढवली आहे. महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांना धनगर समाजाचा मोठा पाठिंबा आहे. महादेव जानकर हे महायुतीत अडगळीत पडले होते. त्यामुळे ते महाविकास आघाडीत सहभागी होतील, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे जानकर यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. पण ऐनवेळी महायुतीच्या नेत्यांनी शक्कल लढवत महादेव जानकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बोलावलं. यावेळी पार पडलेल्या बैठकीत महादेव जानकर यांची नाराजी दूर करण्यात आली. तसेच त्यांच्यासाठी परभणीची जागा सोडण्यात आली.

महादेव जानकर यांनी शरद पवारांना पाठ दाखवल्यानंतर आता पवारांनीही मोठी राजकीय खेळी खेळली आहे. कारण शरद पवार यांच्या पक्षात आता थेट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांचा प्रवेश होणार आहे. भूषणसिंह होळकर यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश हा महाविकास आघाडीसाठी खूप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण होळकर घराण्याशी धनगर समाजाच्या नागरिकांचं एक वेगळं भावनिक नातं आहे. त्यामुळे लोकसभेची आगामी लढत ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

शरद पवार यांचे महायुतीला धक्क्यावर धक्के

शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणातला तेल लावलेला पैलवान असं म्हटलं जातं. त्यामागे कारणही अगदी तसं आहे. शरद पवार हे 83 वर्षांचे आहेत. पण या वयातही ते अतिशय बिकट अशा राजकीय परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. असं असलं तरीही शरद पवार यांनी हार मानलेला नाही. तसेच कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्यातून वाट काढत शरद पवार पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा अनुभव पाहता, त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक चढउतार पाहिले. याचा शरद पवार यांना फार फायदा होतोय. यातूनच शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी महायुतीला धक्क्यावर धक्के देताना दिसत आहेत.

शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात स्वगृही परत घेतले. विजयसिंह यांच्यासह त्यांचे कुटुंबियही पक्षात परतले. विशेष म्हणजे माढातून आता भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

भूषणसिंह होळकर स्टार प्रचारक असणार

पश्चिम महाराष्ट्रात इतका मोठा धक्का दिल्यानंतर शरद पवार यांनी आणखी नामी राजकीय डाव आखला आहे. शरद पवार आणि अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांची काही दिवसांपूर्वी भेट झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर भूषणसिंह होळकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असणार आहेत. भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे.