Bird Flu | बर्ड फ्ल्यू अत्यंत घातक; हायअ‍ॅलर्ट जारी करण्याची गरज: राजेश टोपे

| Updated on: Jan 11, 2021 | 9:48 PM

बर्ड फ्ल्यूचा डेथ रेट हा 10 ते 12 टक्के असून हा आजार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे राज्यात हायअ‍ॅलर्ट घोषित करणं गरजेचं आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. (bird flu is dangerous for humans says rajesh tope)

Bird Flu | बर्ड फ्ल्यू अत्यंत घातक; हायअ‍ॅलर्ट जारी करण्याची गरज: राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्य मंत्री
Follow us on

जालना: बर्ड फ्ल्यूचा डेथ रेट हा 10 ते 12 टक्के असून हा आजार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे राज्यात हायअ‍ॅलर्ट घोषित करणं गरजेचं आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं. (bird flu is dangerous for humans says rajesh tope)

राजेश टोपे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला. बर्ड फ्ल्यूबाबत राज्यात हायअ‍ॅलर्ट देण्याची गरज आहे. कारण या आजाराचा मृत्यू दर 10 ते 12 टक्के आहे. हा अतिशय धोकादायक आजार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे बर्ड फ्ल्यूमुळे मरण पावले आहेत. त्यामुळे आजाराचा प्रसार तातडीने रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने हायअॅलर्ट जारी करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

16 जानेवारीलाच लसीकरण

राज्यात येत्या 16 तारखेलाच कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. दररोज 10 हजार कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. तातडीची गरज म्हणून राज्याला 16 लाख लसींची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती द्यावी आणि कोणती देऊ नये हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, असं सांगतानाच कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती लस आपल्याला मिळणार आहे आज ना उद्या कळेल, असं त्यांनी सांगितलं.

Promo | आखाडा | कडक विषय, कडक चर्चा | दररोज दुपारी 4 वाजता

लसीकरणासाठी आठ लाख कर्मचार्यांची नोंदणी झाली असली तरी राज्याला पहिल्या टप्प्यात 16 लाख लसीच्या डोसेसची आवश्यकता आहे. दररोज दहा हजार कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. (bird flu is dangerous for humans says rajesh tope)

 

संबंधित बातम्या:

Bird Flu | संकट वाढले! राज्यातील पाच जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू; प्रशासन अ‍ॅलर्ट

Bird Flu | परभणीत बर्ड फ्ल्यूचा धसका; संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करणार

परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर

 बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या; डॉ. अजित रानडे यांचं आवाहन

(bird flu is dangerous for humans says rajesh tope)