मुंबईः दाऊदशी संबंधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करण्याचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. आज मुंबई येथील आझाद मैदानावर भाजप समर्थकांनी विराट मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आशीष शेलार, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. दाऊदच्या दबावाला बळी पडून हे सरकार नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीये. त्यांना पाठिशी घालत आहे. दाऊदला मदत करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याासठी सरकारची धडपड आहे. यांना शेतकऱ्यांची चिंता नाहीये. वीजेची कनेक्शन कापली जात आहेत. पिकं जळून जात आहेत. परीक्षांचे पेपर हुकतायत. त्याचं नाही नाही. यांना मलिकांना वाचवायचंय, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाषणात केला.
महाराष्ट्र सरकारवर दाऊदचा दबाव आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्रात 27 महिन्यात पूजा चव्हाणमध्ये संजय राठोडांचा राजीनामा झाला. केवळ जनतेने आवाज उठवला आणि संवेदनशीलता दाखवून राजीनामा घेतला गेला. अनिल देशमुखांच्या बाबतीत हायकोर्टानं सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यांचाही राजीनामा घेतला गेला. मात्र नवाब मलिकांच्या बाबतीत असं का झालं नाही? नवाब मलिकांना कोठडी दिली तेव्हा दिल्लीचं नाव घेतलं गेलं. पण कोर्टानं कोठडी दिली. दाऊदच्या दबावाला दबून राज्य करणाऱ्यांविरोधात हा संघर्ष आहे. नवाब मलिकाचा पुतळा जाळणं, राजीनाम्याची मागणी करणं, यासाठी आंदोलनं झाले. विधानसभा सुरु असल्यामुळे एवढा मोठा आंदोलन सुरु आहे. ज्यांनी राजीनामा घ्यायचा असतो, ते पवार साहेब आणि ज्यांनी सांगितल्यामुळे राजीनामा घ्यायचा असतो, ते पवार साहेब या दोघांना इशारा देण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
नवाब मलिका यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपचं हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा पाटील यांनी दिला. ते म्हणाले, ‘यह तो एक अंगडाई हे आगे और लडाई है, महाराष्ट्राच्या गावा-गावात संघर्ष करू, रस्त्यावर उतरू. तुम्हाला फिरणं मुश्कील करून टाकू. दाऊदशी तुमचं नाव जोडलं गेलंय. दाऊदला मदत करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याासठी सरकारची धडपड आहे. यांना शेतकऱ्यांची चिंता नाहीये. वीजेची कनेक्शन कापली जात आहेत. पिकं जळून जात आहेत. परीक्षांचे पेपर हुकतायत. त्याचं नाही नाही. यांना मलिकांना वाचवायचंय, देवेंद्रजी संघर्ष करो… हम तुम्हारे साथ है… अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजप दिवसेंदिवस आक्रमक होत असतानाच मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनीही दिलं आहे.
इतर बातम्या-