मुंबईः प्रोटेक्ट टू क्राईम आणि प्रोटेक्ट टू टेररीझम ही सरकारची भूमिका आहे, असा गंभीर आरोप मंगळवारी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. सरकारमधील एका मंत्र्यांने दाऊदच्या बहिणीच्या फ्रंटमॅनसोबत कवडीमोल भावात व्यवहार केला. परिवहन मंत्र्यांने मुंबईत म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले. इतर नऊ मंत्र्यांचेही असेच कारनामे आहेत. त्यांची उदाहरणे देतो. सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असे आवाहन केले.
परिवहन मंत्र्यांवर कारवाई करा
शेलार म्हणाले, परिवहन मंत्र्यांनी मुंबईत म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले. ते तोडण्यात आले. त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. मी अशा नऊ मंत्र्यांचे उदाहरण देतो. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यातील इथे बसलेल्यांना त्यांच्या ठिकाणच्या लोकांचे अवैध वाळू आणि अवैध दारुचे धंदे माहित आहेत. प्रोटेक्ट टू क्राईम आणि प्रोटेक्ट टू टेररीझम अशी सरकारची भूमिका आहे, असा घणाघात त्यांनी केला. याकूबला फाशी देण्याची गरज नाही म्हणणारे अस्लम शेख या सरकारमध्ये मंत्री आहेत. दाऊदच्या बहिणीच्या फ्रंटमॅनसोबत एका मंत्र्याने कवडीमोल भावात व्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी केला.
दलालांची गँग सुपर पोलीस
शेलार म्हणाले, शर्जील उस्मानी पुण्यात येतोय काय आणि कार्यक्रम करुन जातो काय? गृहमंत्री हलत नाही आणि पोलिस हलत नाहीत. त्याला कार्यक्रमाची परवानगी याच सरकारच्या काळात मिळाली. सरकार अराजकता निर्माण करणाऱ्यांना समर्थन देते. एक गुन्हा नोंदवायला करुणा नावाची महिला जाते. मात्र, तिला अडकवले जाते. किरीट सोमय्या यांनाही नीलम घरामध्ये थांबवले आणि कराडला ताब्यात घेतले. राज्यात चोर पोलीस खेळ आपण बघितला, पण राज्यात आता पोलीस पोलीस खेळ सुरू आहे. राज्यात दलालांची गँग सुपर पोलीस म्हणून काम करते. सीबीआयला महाराष्ट्रात नो एंट्री आहे. त्यांना २० वर्षापूर्वीचा दाखला देवून नामोहरम केले जाते, असा आरोपही शेलार यांनी केला.
परिवहन मंत्र्यांनी मुंबईत म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले. ते तोडण्यात आले. त्यांच्यावर कारवाई का केली नाही. मी अशा नऊ मंत्र्यांचे उदाहरण देतो. त्यांच्यावर कारवाई करावी. प्रोटेक्ट टू क्राईम आणि प्रोटेक्ट टू टेररीझम अशी सरकारची भूमिका आहे.
Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!https://t.co/utzB0ZkKLN | #Healthcare | #Water | #dangerous | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
इतर बातम्याः