VIDEO: आमदार होण्यासाठी कुणी निमंत्रणाचा नारळ दिला नव्हता, आमदारांना घर हवंच कशाला?; chandrakant patil यांचा सवाल

| Updated on: Mar 25, 2022 | 2:20 PM

आमदारांच्या घरावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घरांच्या निर्णयावरून सरकारला खडा सवाल केला आहे. आमदार पळून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारांवर इतका वर्षाव सुरू आहे.

VIDEO: आमदार होण्यासाठी कुणी निमंत्रणाचा नारळ दिला नव्हता, आमदारांना घर हवंच कशाला?; chandrakant patil यांचा सवाल
आमदारांना घर हवंच कशाला?; chandrakant patil यांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राहुल झोरी, मुंबई: आमदारांच्या घरावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी या घरांच्या निर्णयावरून सरकारला (mahavikas aghadi) खडा सवाल केला आहे. आमदार पळून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारांवर इतका वर्षाव सुरू आहे. चार कोटीचा आमदार निधी दिला. तो आधी मुळात दोन कोटी होता. कोविड असतानाही चार कोटी केला. आता पाच कोटी केला. ड्रायव्हरचे पगार वाढवले. सहाय्यकचे पगार वाढवले. घरे देणार. कशासाठी पाहिजे घरं?, असा सवाल करतानाच आमदार व्हा म्हणजे तुम्हाला घरं मिळतील. पाच कोटींचा निधी मिळेल, असा कुणी काही आमदार (mla) होण्यासाठी निमंत्रणाचा नारळ दिला नव्हता. आमदारांचा रोष पत्करून हे मी बोलत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली.

मला मुंबईत घर नाही तरीही मला जे घर देणार आहात ते देऊ नका. तेच पैसे शेतकऱ्यांना द्या. एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या. माझ्यासारखे आणि सदाभाऊ खोतांसारखे सोडले तर प्रत्येकाचे चार चार घरे आहेत. क्षमता आहे, असं पाटील म्हणाले.

आमदारांच्या दाढ्या कुरवाळणं सुरू

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांची रोज डिनर डिप्लोमसी सुरू असल्याचं सांगितलं. डिनर डिप्लोमसी काय… पहिल्यांदाच 27 महिन्यात अधिवेशन चाललं. रोज त्यांना डिप्लोमसी करावी लागते. शिवसेनेचे 25 आमदार म्हणत आहेत की, आम्ही बजेटवर बहिष्कार टाकणार. कधी बाकीचे आमदार म्हणतात की, आम्हाला सुविधा वाढवा नाही तर आम्ही बाहेर पडतो. त्यामुळे रोज उठून आमदारांच्या दाढ्यांना हात लावून हे सरकार चाललं आहे, असा टोला त्यांनी लगावला.

या जन्मी जे कारल ते इथेच फेडावं लागतं

आम्ही आमची घरं चालवताना, आमची घरं उभी करताना समाजाचं शोषण करून किंवा भ्रष्टाचार करून आम्ही आमची घरं चालवली नाही. पटो न पटो या जन्मी केलं तर या जन्मीच फेडावं लागतं. आम्ही काही केलं असेल तर आमच्यावरही कारवाई झाली पाहिजे. तुमच्या घरात विनाकारण कोण घुसतंय. आता सुप्रीम कोर्टावरही तुमचा आक्षेप सुरू झालाय म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवरही तुमचा विश्वास नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Pratap Sarnaik property attached: सर्वात मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त, शिवसेनेला ईडीचा दुसरा दणका

आमदारांना मोफत घरे नाहीच, आमदारांना कितीला पडणार घर?; Jitendra Awhad यांनी सांगितली किंमत

मेव्हणा पकडला अन् मुख्यमंत्री बाहेर आले, Nilesh Rane यांची Uddhav Thackeray यांच्यावर खोचक टीका