“एकीकडे मायमाऊलीला मजबूत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. काही लोकांना ते पहावत नाहीय. काही लोक लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून हायकोर्टात गेले. मला दु:ख आहे, हायकोर्टात गेलेला व्यक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निवडणूक प्रमुख आहे. माझी त्यांना विनंती आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे की, लाडकी बहिण योजनेला राजकीय चष्म्यातून पाहू नका, विरोध करु नका” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
“ही योजना आपल्या सगळ्या बहिणींकरता तयार करण्यात आली आहे. बहिणीच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्यानंतर बहिणींना त्याचं मोल समजतं. पण जे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत, त्यांना हे समजणार नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “दिवसभर राबणाऱ्या आमच्या बहिणींनी योजनेच मोल माहित आहे. आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्धार केला आहे, काहीही झालं तरी ही योजना बंद होऊ देणार नाही. योजना सुरु राहील, तुमचा आशिर्वाद जो पर्यंत पाठिशी आहे तो पर्यत ही योजना बंद होऊ शकणार नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“लाडक्या भावांसाठी कार्यप्रशिक्षण योजना आणली. त्यात 10 हजार रुपये, नोकरी देत आहोत. एवढच नाही, तर आपल्या शेतकऱ्यांना आता वीजेच बील माफ केलं आहे. शेतकऱ्यांना वीजेच बिल भरावं लागणार नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.