‘संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड जेलमध्ये गेलाच पाहिजे’, गिरीश महाजन यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

| Updated on: Dec 24, 2024 | 3:19 PM

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांकडून केला जातोय. पोलिसांनी याप्रकरणी अनेक आरोपींना अटक केली आहे. पण तरीदेखील या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने निशाणा साधला जातोय. या प्रकरणावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड जेलमध्ये गेलाच पाहिजे, गिरीश महाजन यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर गिरीश महाजन यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
Follow us on

मंत्री गिरीश महाजन यांनी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. “भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अतिशय महत्त्वाचे मुद्दे नागपूर येथील अधिवेशनात मांडले होते. संतोष देशमुख यांची एवढी क्रूर हत्या केली आहे, जो कुणी मास्टरमाईंड असेल तो जेलमध्ये गेलाच पाहिजे”, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली. “बीडची फार दुर्दैवी घटना आहे. पण सुरेश धस यांचा बोलणं हे चुकीचं असून त्यांनी महाराष्ट्राची तुलना बिहारशी करणे चुकीचे आहे”, असंदेखील गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

“मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे कागदपत्र अंजली दमानिया यांनी ट्विट केले आहे. यावर मंत्री महाजन म्हटले की, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया, सुरेश धस हेही म्हणाले आहेत की, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे सबंध आहेत. याबाबतीत धनंजय मुंडे सुद्धा म्हणाले आहेत की माझे त्यांच्याशी संबंध आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.

गिरीश महाजन पालकमंत्रीपदाबाबत काय म्हणाले?

गिरीश महाजन यांना यावेळी नाशिकचे पालकंमंत्री होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत असून मी कधीही म्हटलं नाही की, मला नाशिकचा पालकमंत्री व्हायचा आहे. मला पालकमंत्री पदाबाबत कुठलाही आग्रह नसून मला जिथे देतील तिथे मी काम करेन”, असं गिरीश महाजन म्हणाले. “कुंभमेळा १२ वर्षांनी पार पडणार असून गेल्यावेळेस अतिशय सुंदर नियोजन केले होते. समुद्रापार त्या कार्यक्रमाची चर्चा झाली होती. त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री जर झालो तर चांगलंच आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले. पालकमंत्री पदाच्या बाबत आपला कोणताही आग्रह नाही. दिया उसका भी भला, न दिया उसका भी भला कर, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

गिरीश महाजन यांनी केली बागेश्वर बाबांच्या कथास्थळाची पाहणी

मंत्री गिरीश महाजन यांनी आज बागेश्वर बाबा यांच्या कथास्थळाची पाहणी केली. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे बागेश्वर बाबांची हनुमंत कथा होणार आहे. “धीरेंद्र कृष्णशास्त्री यांची हनुमान कथा धरणगाव तालुक्यातील झुररखेडा गावामध्ये कथा होत असून आमच्यासाठी आनंददायी क्षण आहे. शंभर एकरमध्ये ही कथा पार पडत आहे. गावकऱ्यांमध्ये उत्साहाचा वातावरण आहे. पाच लाख भाविक या कार्यक्रमास येणार आहे. प्रशासनाची तयारी पूर्णत्वास आली आहे,” अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.