मुंबई : “सरकारच्या पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंपन्यांना 4274 कोटीचा रुपयांचा फायदा झाला. तसेच सरकारच्या बीड पॅटर्नमुळे महाविकास आघाडीच्या वसूली सरकारचं भलं होणार आहे. शेतकऱ्यांना 13 कोटी 42 लाख मदत रुपयांची मिळाली. पण राज्य शासनाला मात्र 626 कोटी रुपये मिळणार आहेत. या बीड पॅटर्नमुळे राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे,” असा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP leader Pravin Darekar) यांनी केला. ते आज राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात विधानपरिषद पुरवणी मागणीच्या चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या. (BJP leader Pravin Darekar criticizes state government over crop insurance Beed pattern)
विधानपरिषदेत सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवर बोलताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पीक विम्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बीड पॅटर्नचा विरोध केला. त्यांनी “बीड पॅटर्नमुळे महाविकास आघाडी वसूली सरकारचं भलं होणार आहे. या पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त 13 कोटी 42 लाख रुपये मिळाले असताना राज्य शासनाला यामध्ये 626 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच बीड पॅटर्नमुळे राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे. जे लाखो शेतकरी क्लेम सादर करू शकले नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही,” असे सांगत बीड पॅटर्न हा शेतकऱ्यांचा हिताचा नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
तसेच पुढे बोलताना शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठ्या घोषणा केल्या. पण कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत देण्यात आली नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला. तसेच पीक विम्याच्या योजनेवर गंभीर टीका केली. “पीक विमा योजनेमध्ये या सरकारच्या काळात 138 लाख शेकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला होता. त्यापैकी 15 लाख शेतकऱ्यांना परतावा दिला गेला. जेवढी रक्कम कंपन्यांकडे जमा झाली त्यापैकी फक्त 18 टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. या सरकारच्या कृपेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंपन्यांना 4234 कोटी रुपयांचा फायदा झाला,” असे प्रविण दरेकर म्हणाले.
तसेच पुढे बोलताना दरेकर यांनी कृषी, मत्स्यविभाग, सिंचन, गृहनिर्माण, नगरविकास, आदीवासी विकास तसेच बीडीडी चाळींचा पुनर्वसन आदी विविध विषयांवर सरकारला धारेवर धरले. दरेकर यांनी सांगितले की, मृदु व जलसंधारण विभागात घोटाळा झाला. 2 हजार कोटीचे काम एकाच वेळी निविदा काढून कशाप्रकारे केले ? असा सवाल त्यांनी केला.
इतर बातम्या :
(BJP leader Pravin Darekar criticizes state government over crop insurance Beed pattern)