Nitesh Rane | 8 जूनला पांचोलीच्या जुहूच्या घरी लहान मुलं का आणलेली? नितेश राणेंचा आदित्य ठाकरे यांना सवाल

| Updated on: Jul 11, 2023 | 11:09 AM

Nitesh Rane | "उद्धव ठाकरे यांचे कपडे कसे फाडायचे हे आम्हाला चांगल माहितीय. जया जाधवला का मारलं? मातोश्रीत काय चुकीच्या गोष्टी चालतात हे आम्हाला माहितीय. हे सर्व पुराव्यासकट महाराष्ट्रासमोर आणू"

Nitesh Rane | 8 जूनला पांचोलीच्या जुहूच्या घरी लहान मुलं का आणलेली? नितेश राणेंचा आदित्य ठाकरे यांना सवाल
Nitesh Rane-Aditya Thackeray
Follow us on

मुंबई : “मोठ्या संस्काराबद्दल बोलतोस, तुझा तो मुलगा ठाकरे नावावर कलंक आहे. दिशा सालियानला कसं मारलं?. हा दिशा सालियन फक्त याच विषयाला घाबरत नाही. 8 जूनला पांचोलीच्या जुहूच्या घरी लहान मुलं का आणलेली? याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यावं. लहान मुलं आणि आदित्य ठाकरे यांचा काय संबंध? कुठल्या NGO च्या माध्यमातून मुलं तिथे आलेली?” असे प्रश्न भाजपा आमदार नितेश राणे यांनी विचारले आहेत.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल विदर्भातील एका सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस हे नागपूरला कलंक असल्याच विधान केलं होतं. त्याचा समाचार नितेश राणे यांनी आज घेतला.

‘कलंक लावण्याच काम आदित्य ठाकरेंनी केलं’

नितेश राणे यांनी खूप बोचऱ्या शब्दांचा वापर केला. “बाळासाहेबांनी ठाकरे नाव मोठं केलं. प्रबोधनकार ठाकरेंपासून राज ठाकरेंपर्यंत ठाकरे नाव मोठं केलं. त्याला कलंक लावण्याच काम आदित्य ठाकरे यांनी केलं” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

‘आदू बाळ लवकर आर्थररोड तरुंगात जाणार’

“आज तुझा जो थयथयाट सुरु आहे. तू घाबरतोयस, फडणवीसांना नाव ठेवत आहेस, तुला माहितीय आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार आहे. भ्रष्टाचार, दिशा सालियान प्रकरणाचे पुरावे आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचतायत. आदू बाळ लवकर आर्थररोड तरुंगात जाणार आहे” असं नितेश राणे म्हणाले.

जया जाधवला का मारलं?

“कोविडमध्ये ज्या-ज्या लोकांची चौकशी झाली, त्यांनी चौकशीत आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे. हे उद्धव ठाकरे यांना माहित आहे” असं नितेश राणे म्हणाले. “यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीची टीका केलीस, तर उद्धव ठाकरे यांचे कपडे कसे फाडायचे हे आम्हाला चांगल माहितीय. जया जाधवला का मारलं? मातोश्रीत काय चुकीच्या गोष्टी चालतात हे आम्हाला माहितीय. हे सर्व पुराव्यासकट महाराष्ट्रासमोर आणू” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.