Suresh Dhas : खोक्या प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या हत्येचा कट – सुरेश धस यांचा गंभीर आरोप

| Updated on: Apr 01, 2025 | 9:37 AM

खोक्या भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाच कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हे आरोप केले .

Suresh Dhas : खोक्या प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या हत्येचा कट - सुरेश धस यांचा गंभीर आरोप
सुरेश धस
Image Credit source: social media
Follow us on

खोक्या भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हे आरोप केले आहेत. राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोकं मुंबईत आणली गेली. धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना सांगितलं,बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन ठरवायचं होतं असा गंभीर आरोप धस यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ माजली आहे.

धसांच्या गौप्यस्फोटाने खळबळ 

खोक्या उर्फ सतीश भोसले याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, त्याच्यावर अनेक आरोप झाले होते, त्याच्यावर शिकारीचा देखील आरोप लावण्यात आला होता. आणि जे मटण होतं, ते सुरेश धस यांना दिलं जात होतं, असाही आरोप झाला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत एक गौप्यस्फोट केला आहे. मला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आला होता. बिश्नोई गँगला देखील पाचारण करण्यात आलं होतं, असं धसांनी म्हटलं असून त्यांच्या या गौप्यस्फोटांमुळे आणि गंभीर आरोपांमुळे चांगलीच खळबळ माजलेली आहे. या कटामध्ये आणखी कोणी सामील आहे का, सुरेश धसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जीवाला धोका आहे, तर त्यासंदर्भात त्यांनी गृहविभागाला काही पत्र लिहीलं आहे का किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी या संदर्भात काही बातचीत केली आहे का ? याबद्दल अद्याप कोणतीही सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. सुरेश धसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न टीव्ही9 मराठीने केला, मात्र तो संपर्क होऊ शकलेला नाही.

खोक्या भोसलेचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत होतं. खोक्या भोसलेने हरणांची शिकारसुद्धा केल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्या माध्यमातून खोक्या भोसले हा सुरेश धस यांना हरणांचं मांस पुरवत होता, असे आरोपही काही लोकांनी केले होते. याच आरोपाच्या मुद्यावर बोलताना आता धस यांनी एका मुलाखतीत हा आरोप केला आहे. बिश्नोई गँगला मुंबईत आणलं गेलं आणि माझ्या खुनाचा डाव, कट रचण्याचा प्रयत्न झाला असा धक्कादायक खुलासा धस यांनी एका खासगी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत केला.

ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणावी लागेल, कारण खोक्या भोसलेचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं. खोक्या भोसले हा बराच काळ फरारही होता. नंतर त्याला अटकही झाली, त्याचं घरही पाडण्यात आलं होतं. त्याच्या घरात वन्यप्राण्याचं वाळलेलं मांस सापडल्याचा मुद्दाही समोर आला होता. आणि त्याचाच आधार धरून खोक्या भोसले हा सुरेश धस यांना हरणांचं मांस पुरवत होता अशा स्वरुपाचा गंभीर आरोप करण्यात आला होता.